Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शेवटच्या मतापर्यंत अटीतटीचे चित्र!

Share

शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे व काँग्रेसचे लहू कानडे यांच्यासह 11 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी काल 310 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. एकूण 11 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रचार कालावधीत प्रत्येक उमेदवाराने आपापल्या परीने मतदारांपर्यंत जाऊन विकासासाठी आपले काय व्हिजन असणार आहे हे पटवून सांगितले होते. त्यामुळे या मतदारसंघात अतिशय अटीतटीची लढत पाहायला मिळाली.

श्रीरामपूर मतदारसंघातील रखडलेले विविध विकासकामे, विस्कळीत झालेले पाटपाण्याचे नियोजन त्यामुळे शेतीची झालेली वाताहत, उद्योगधंदे नसल्याने बेसुमार वाढलेली बेरोजगारी आदी मुद्दे घेऊन प्रत्येक उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. या मतदारसंघामध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे भाऊसाहेब मल्हारी कांबळे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे लहु नाथा कानडे, श्रीरामपूर तालुका जनसेवा विकास आघाडी पुरस्कृत रामचंद्र नामदेव जाधव, अ‍ॅड. गोविंद बाबुराव अमोलिक (बहुजन समाज पार्टी), भाऊसाहेब शंकर पगारे (मनसे), अशोक रामचंद्र आल्हाट (जनहीत लोकहीत पार्टी), सुधाकर दादा भोसले (बहुजन मुक्ती पार्टी), सुरेश एकनाथ जगधने (एमआयएम), भिकाजी राणु रणदिवे (अपक्ष), सना मोहमंद अली सय्यद (अपक्ष), डॉ. सुधीर राधाजी क्षीरसागर (अपक्ष) असे 11 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे या मतदारसंघात अतिशय अटीतटीची लढत पहायला मिळाली. तर गुरुवार दि. 24 ऑक्टोबर 2019 रोजी विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

गावनिहाय मतदान – गोंडेगाव – येथे 64.87 टक्के मतदान झाले. 3 हजार 291 मतदारांपैकी 2 हजार 135 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भामाठाण – येथे 69.33 टक्के मतदान झाले. 1 हजार 539 मतदारांपैकी 1 हजार 67 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मातलुठाण – येथे 64.81 टक्के मतदान झाले. 1 हजार 33 मतदारांपैकी 676 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. फत्याबाद येथे – 1265 मतदारांपैकी 850, मांडवे – येथे 748 पैकी 540, कुरणपूर – येथे 1114 मतदारांपैकी 782, कडीत खुर्द येथे 776 मतदारांपैकी 440, कडीत बुद्रुक – येथे 440 मतदारांपैकी 313, चांडेवाडी येथे 389 मतदारांपैकी पैकी 289 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रांजणखोल – राहाता तालुक्यातील रांजणखोल परिसरात 72.5 टक्के मतदान झाले. 3500 मतदारांपैकी 2 हजार 576 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

बेलापूर- ऐनतपूर – येथे 13970 मतदारांपैकी 8725 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याठिकाणी सरासरी 62.45 टक्के मतदान झाले. पढेगाव – येथे 59 टक्के मतदान झाले. 5 हजार 723 मतदारांपैकी 3 हजार 384 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उंदीरगाव – येथे 61.68 टक्के मतदान झाले. 5 हजार 810 मतदारांपैकी 3 हजार 584 मतदारांनी मतदान केले. मालुंजा – येथे 62.42 टक्के मतदान झाले. 2 हजार 850 मतदारांपैकी 1779 मतदारांनी मतदान केले. गुजरवाडी – येथे 76.80 टक्के मतदान झाले. 694 पैकी 533 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वांगी बुद्रुक – येथे 67.47 टक्के मतदान झाले. 1189 पैकी 826 मतदारांनी मतदान केले. खिर्डी – येथे 68.60 टक्के मतदान झाले. 1650 पैकी 1132 मतदारांनी मतदान केले. वांगी खुर्द – येथे 573 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने 73.36 टक्के मतदान झाले. रामपूर – येथे 70.7 टक्के मतदान झाले. 728 पैकी 514 मतदारांनी मतदान केले. नाऊर – येथे प्रभाग क्र. 8 मध्ये 64.94 टक्के मतदान झाले. 989 पैकी 643 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर प्रभाग 9 मध्ये 905 पैकी 586 मतदारांनी मतदान केल्याने 64.75 टक्के मतदान झाले. नवे नायगाव – येथे 56.16 टक्के मतदान झाले. 496 मतदारांनी मतदान केले. जुने नायगाव – येथे 65 टक्के मतदान झाले. 391 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जाफ्राबाद – येथे 65.96 टक्के मतदान झाले. एकूण 801 मतदारांपैकी 529 मतदारांनी मतदान केले. सरला – येथे 55 टक्के मतदान झाले. 1 हजार मतदारांपैकी 541 मतदारांनी मतदान केले. गोवर्धन – येथे 61.45 टक्के मतदान झाले. 728 मतदारांपैकी 447 मतदारांनी मतदान केले. वडाळा महादेव – येथे 71.68 टक्के मतदान झाले. एकूण 4 हजार 471 मतदारांपैकी 3 हजार 205 मतदारांनी मतदान केले.

खैरी निमगाव – खैरीमध्ये एकूण 2 हजार 192 मतदारांपैकी 1350 मतदारांनी मतदान केल्याने 61.58 टक्के मतदान झाले. तर निमगाव मधील मतदान केंद्र क्रं.27 मध्ये 663 मतदारांपैकी 439 मतदारांनी मतदान केले. निमगावात एकूण 1995 मतदारांपैकी 1322 मतदारांनी मतदान केल्याने 66 टक्के मतदान झाले. एकूणच खैरी निमगाव मध्ये 4187 मतदारांपैकी 2672 मतदारांनी मतदान केल्याने सरासरी 64 टक्के मतदान झाले.

टिळकनगर – एकलहरे येथील बूथ क्रमांक 199 वर एकूण 951 मतदारापैकी 634 मतदारांनी मतदान केल्याने 66.66 टक्के मतदान झाले. तर लजपतरायवाडी येथील बूथ क्रमांक 200 मध्ये एकूण मतदान 670 असून त्यापैकी 481 मतदान झाले आहे. येथील टक्केवारी 71.79 झाली. एकूण 1621 मतदारांपैकी 1115 मतदारांनी मतदान केल्याने 68. 78 टक्के मतदान झाले. उक्कलगाव – येथे 4200 मतदारांपैकी 2925 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे 71 टक्के मतदान झाले. हरेगाव- येथे 4351 मतदारांपैकी 2511 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याठिकाणी सरासरी 55 टक्के मतदान झाले. शिरसगाव – येथे 5761 मतदारांपैकी 3480 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याठिकाणी सरासरी 60.41 टक्के मतदान झाले. भोकर – येथे 4853 मतदारांपैकी 3142 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे सरासरी 64.74 टक्के मतदान झाले. खोकर – येथे 2831 मतदारांपैकी 1853 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे 65.45 टक्के मतदान झाले.

टाकळीभान – येथे 66.38 टक्के मतदान झाले. दुपारी 1 वाजेपर्यंत मतदान धिम्या गतीने सुरु असल्याने केवळ 26 टक्के मतदान झाले होते. मात्र दुपारी चार नंतर मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याने सहा वाजताची वेळ संपूनही मतदान केंद्रावर रांगा होत्या. बूथ क्रमांक 184 वर 7 वाजेनंतर मतदान पूर्ण झाले. येथील एकूण 7 मतदान केंद्रावर एकूण 7759 मतदान होते. त्यापैकी 5151 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत 66.38 टक्के मतदान केले.
खंडाळा – येथे 65.55 टक्के मतदान झाले. 4488 पैकी 2942 मतदारांनी मतदान केले. माळवाडगाव – येथे 68.33 टक्के मतदान झाले. 2438 मतदारांपैकी 1666 मतदारांनी मतदान केले. मुठेवाडगाव – येथे 73 टक्के मतदान झाले. 1931 मतदारांपैकी 1417 मतदारांनी मतदान केले. खानापूर जुने गाव – येथे 63 टक्के मतदान झाले. 811 मतदारांपैकी 562 मतदारांनी मतदान केले. नवीन गावठाण – 71 टक्के मतदान झाले. 813 पैकी 579 मतदारांनी मतदान केले.

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या राहुरी तालुक्यातील – देवळाली प्रवरा – शेटेवाडीसह देवळाली प्रवरा परिसरात 63.33 टक्के मतदान झाले. 15 हजार 545 मतदारांपैकी 9 हजार 847 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मालुंजा खुर्द – येथे 64 टक्के मतदान झाले. 816 मतदारांपैकी 527 मतदारांनी मतदान केले. महालगाव – येथे 70.11 टक्के मतदान झाले. 532 पैकी 373 मतदारांनी मतदान केले.
राहुरी फॅक्टरी – येथे एकूण 6 हजार 116 पैकी 3 हजार 454 मतदारांनी मतदान केले. टाकळीमिया – येथे 62.31 टक्के मतदान झाले. एकूण 7 हजार 931 मतदारांपैकी 4 हजार 942 मतदारांनी मतदान केले. तिळापूर- 59.95 टक्के मतदान झाले. 1236 मतदारांपैकी 741 मतदारांनी मतदान केले. वांजुळपोई- 64.72 टक्के मतदान झाले. 1131 पैकी 732 मतदारांनी मतदान केले. कोपरे – येथे 64 टक्के मतदान झाले. 751 पैकी 481 मतदारांनी मतदान केले. शेनवडगाव – येथे 77.16 टक्के मतदान झाले. 543 मतदारांपैकी 419 मतदारांनी मतदान केले. मांजरी – येथे 65.97 टक्के मतदान झाले. 2780 मतदारांपैकी 1834 मतदारांनी मतदान केले. पाथरे – येथे 1960 मतदारांपैकी 1338 मतदारांनी मतदान केले. खुडसरगाव – येथे 76.41 टक्के मतदान झाले. 1111 मतदारांपैकी 849 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!