Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

धकधक…निकाल 12 तासांवर

Share

निकाल 12 तासांवर । उत्सुकता शिगेला

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरी आमदारकीचा गुलाल कोण घेणार?, 25 वर्षे आमदार असलेले अनिल राठोड यांचा भगवा पुन्हा फडकणार की विकासाच्या वाटेवर चालणारे संग्राम दुसर्‍यांदा मुंबई गाठणार? या प्रश्नांच्या उत्तरांनी समर्थकांचा जीव धकधक करू लागला आहे. निकाल आता अवघ्या 12 तासांवर येवून ठेपल्याने समर्थकांची धडकन वाढत असल्याचे चित्र आहे.

भाजप-सेना युती झाल्याने अनिल राठोड यांचा आत्मविश्वास कमालाचा वाढला आहे. त्यातच शिवसेनेकडून मंत्री पदाचा शब्द दिल्याचे सांगत राठोड यांनी सत्तरीतही पायाला भिंगरी लावली मतदारांचा उंबरठा ओलांडला. हिंदुत्वाच्या जोडीला संपूर्ण संरक्षण आणि विकासाची जोड देत शिवसेनेने प्रचाराचा रथ हाकला.

राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी पाच वर्षातील विकास कामांचा लेखाजोखा मांडत पुढच्या पाच वर्षाचे व्हिजन नगरकरांसमोर मांडले. भावनिक राजकारणाचे दिवस संपले असा नारा देत विकास या एकाच मुद्यावर मतं मागितली. तरुणांची फौज आणि कार्यकर्त्यांचा गोतावळा या जोरावर त्यांनीही विजयाचा दावा केला आहे.

या सगळ्या मुद्यांभोवती चर्चा करत कोण बाजी मारणार या प्रश्नांनी समर्थकांची धकधक वाढली आहे. सर्व्हे, पोलीस रिपोर्ट आणि आकडेमोड करत जगताप समर्थकांनी गुलाल घेणारच असा दावा केला आहे. किती मतांनी विजयी होणार, होणार की नाही? या प्रश्नांनी राठोड आणि जगताप या दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांच्या ‘दिल की धडकन’ वाढली आहे.

14 टेबल… 21 फेर्‍या…
उद्या गुरूवारी सकाळी 8 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होणार आहे. सुरूवातीला पोस्टल आणि नंतर ईव्हीएम मशीनची मतं मोजली जाणार आहेत. 14 टेबलवर ईव्हीएम आणि दोन टेबलवर पोस्टल मतमोजणी होणार आहे. शहर मतदासंघात मतमोजणीच्या 21 फेर्‍या होतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

कुणाचा फायदा, कुणाचा तोटा…
राठोड, जगताप यांच्याशिवाय बसपा, वंचित बहुजन, एमआयएम, मनसे, कम्युनिस्ट पार्टीसह 10 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कोण किती मतदान घेणार याचे आडाखे बांधत विजयाचे गणित मांडले जात आहे. अमुक उमेदवार तमूक उमेदवारांचे मत खाईल, त्याला इतके मतदान पडले तर याचा इतका तोटा होईल अशी गणित मांडली जात आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!