Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

विधानसभा निवडणूक 10 ते 13 ऑक्टोबरदरम्यान होण्याची शक्यता – गिरीश महाजन

Share

नाशिक – विधानसभेच्या निवडणूका ऑक्टोबर महिन्याच्या 10 ते 13 तारखेच्या दरम्यान होण्याचे संकेत आज गिरीश महाजन यांनी दिले. नाशिक येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप-शिवसेनेने तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीनेही विधानसभेच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यानुसार सर्वपक्षीयांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

येत्या 10 किंवा 15 सप्टेंबरमध्ये आचारसंहिता लागू शकते. त्यानुसार यंदा 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल. असा अंदाज गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही विधानसभा निवडणुकीच्या तारखेबाबत अंदाज व्यक्त केला होता. येत्या 9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे यंदा 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगितले होते. त्यानंतर आता गिरीश महाजन यांनीही 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल, असे सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!