Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

रोहित पवार 40 हजाराहूून अधिक मतांनी विजयी

Share
कर्जतसाठी कुकडीचे 19 दिवस आवर्तन : आ. रोहित पवार, Latest News Karjat Kukadi Avratan, Mla Pawar Statement karjat

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित राजेंद्र पवार यांनी तब्बल 43 हजार 347 मतांनी पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला आहे. आज कर्जत येथील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या शासकीय गोडावूनमध्ये मतमोजणी करण्यात आली यावेळी 353 मतदान केंद्र 14 टेबल व 26 फेर्‍या व्दारे मतमोजणी करण्यात आली पहिल्या फेरीपासून रोहित पवार यांनी शेवट पर्यंत आघाडी घेतली होती दरम्यान सकाळी पालकमंत्री राम शिंदे यांनी मतमोजणी केंद्रात प्रवेश केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांनी मतमोजणी केंद्रात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता रोहित पवार यांच्या मताधिक्य वाढत असल्याचे पाहुन राम शिंदे यांनी मागच्या गेट मधून बाहेर पडुन गाडीत बसून निघून गेले दरम्यान रोहित पवार यांनी तहसील कार्यालयाच्या मिडिया सेल मध्ये तब्बल एक ते दीड तास बसून राज्याचा निवडणूकीचा आढावा घेतला.

एकुण मते पडलेले
रोहित पवार 1 लाख 35 हजार 824, राम शिंदे 92 हजार 477, अरुण जाधव 3849 , राम रंगनाथ शिंदे 2070, आप्पासाहेब पालवे 345 , भैलुमे शंकर 586 , सोमनाथ शिंदे 391, गोवींद आंबेडकर 205, अ‍ॅड पाटील सुमित कन्हैया 792, बजरंग सरडे 214, महारूद्र नागरगोजे 386, ज्ञानदेव सुपेकर 350, आणि नोटा ला 867 असे मत यांना पडले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!