Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजणार

Share

मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभेची तारीख काल शुक्रवारी जाहीर होणे अपेक्षित होते. पण निवडणूक आयोगाचे अधिकारी आढावा बैठकीत गुंतल्याने निवडणुकीची तारीख जाहीर होऊ शकली नाही. त्यामुळे आता ती कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांनी मुंबईत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यांनी महाराष्ट्रातील अधिकार्‍यांशी चर्चा केली. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पण त्यात तारखा जाहीर करण्यात आल्या नाहीत.

महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणूका दिवाळीपूर्वी पार पडणे गरजेचे आहे. दिवाळीचा सण 27 ऑक्टोबरला आहे. ज्याक्षणी निवडणूक तारखा जाहीर होतील . तेव्हापासून आचारसंहिता सुरू होईल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!