Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

डांबर घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदाराचा खुलासा सादर

Share
बेकायदा रस्ते खोदाईप्रकरणी महानेटकडून भरपाई घेण्याचा ठराव, Latest News Excavation Illegal Roads Compensation Ahmednagar

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी
बांधकाम विभागाचा अभिप्राय मागविला

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग आणि संगमनेर विभागातील रस्त्यांच्या कामात एकच डांबराचे चलन दाखवून 274.29 मेट्रीक टन डांबरचा घोटाळा केल्याचा ठपका श्रीरामपूरचे कंत्राटदार जुनेद शेख यांच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला असून गुरूवारी शेख यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला त्यांचा खुलासा सादर केला आहे. 

दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने शेख यांनी सादर केलेला खुलासा आणि त्यात तपशीलवार दिलेली माहिती योग्य आहे की नाही, याची शहनिशा करून याबाबत सुस्पष्ट अहवाल जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला दिला आहे. यामुळे बांधकाम विभागाला त्यांच्या विभागातील घोटाळ्याची तपासणी करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी अशोक केशव मुंडे, औरंगाबाद यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे झालेल्या चौकशीत शेख यांची हात की सफाई समोर आली आहे.

शेख यांनी जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कामांत आणि संगमनेर विभागात येणार्‍या रस्त्यांच्या कामांत करण्यात आलेल्या डांबरामध्ये 274.29 मेट्रीक टन तफावत असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळे शेख यांना 60 ते 65 लाख रुपयांचा फायदा झाला असून शासनाची फसवणूक झाल्याचा ठपका प्राथमिक चौकशीत समोर आल्यानंतर त्यांना नोटीस देण्यात आली होती.आता त्या नोटीसला शेख यांनी लेखी स्वरूपात उत्तर दिले आहे.

नजर चुकीने 140 बंधार्‍यांना मंजुरी
जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता यांनी टेंडर समिती आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची परवानगी न घेताच तब्बल 140 बंधार्‍यांच्या कामांना परस्पर मंजुरी दिली. याबाबत त्यांना नोटीस काढल्यानंतर त्यांनी नजर चुकीने या बंधार्‍यांच्या कामाला मंजुरी दिली असल्याचा लेखी खुलासा प्रशासनाला सादर केला आहे. प्रभारी असणार्‍या त्या कार्यकारी अभियंत्यावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे जिल्हा परिषदेचे लक्ष लागले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!