पैसे मागितले; पुरवठा निरीक्षक निलंबित पुरवठामंत्र्यांंकडून दखल

0
नाशिक | दि. २ प्रतिनिधी – शिधापत्रिकाधारकांचे आधारक्रमांक पुरवठा खात्याच्या सॉफ्टवेअरशी जोडण्याच्या कामासाठी पुरवठा निरीक्षकाकडून रेशन दुकानदारांकडे पैसे मागितल्याप्रकरणी व्हायरल झालेल्या चित्रफितीची दखल पुरवठामंत्र्यांनी घेतली. त्यामूळे खडबडून जागे झालेल्या पुरवठा खात्याने तातडीने सदरील निरीक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना सादर केला असता सदरील कर्मचारयाला निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

सर्व धान्य दुकानात आधारकार्डवर बायोमॅट्रीक प्रणालीव्दारे धान्य वितरणाची योजना पुरवठा खात्याने सुरू केली आहे. याकरीता शिधापत्रिकाधारकाचा आधार क्रमांक पुरवठा खात्याच्या सॉफटवेअरमध्ये नोंदवणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हयातील रेशन दूकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांचे आधारकार्ड गोळा करून ठेकेदाराकरवी डाटा एंट्री केली जात आहे.

मात्र हे काम करण्यासाठी नाशिक धान्य वितरण कार्यालयातील शेख नामक पुरवठा निरीक्षकाकडून रेशन दूकानदारांकडून प्रति कार्ड पैसे मागितले जात असल्याची चित्रफित फेसबुकवर व्हायरल झाली. या प्रकाराने धान्य घोटाळयाने गाजलेला नाशिकचा पुरवठा विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला. चित्रफितीत दुकानदार शेख याच्या ताब्यात पैसे देत असल्याचे दिसत आहे.

पैसे न दिल्यास डाटा फ्रिज करून टाकतो असा दमही सदर निरीक्षक देतांना या चित्रफितीत दिसत आहे. मात्र सदर काम ठेकेदाराकडून पुरवठा खात्याच्या निधीतून केले जात असले तरी या कामासाठी रेशन दुकानदारांकडून यासाठी पैसे द्यावे असा आग्रह धरला जात असल्याने पुरवठा विभागातील भ्रष्टाचाराला पुष्टीच या चित्रफितीव्दारे मिळत आहे.

काम न करताच बिल अदा
पुरवठा खात्याच्या कारभारात पारदर्शकता येण्यासाठी बायोमॅट्रीक प्रणालीचा अवलंब सुरू करण्यात आला. याकरीता पुरवठा विभागाकडून डाटा एन्ट्रीची जी कामे ज्या ठेकेदाराला देण्यात आली आहेत तया ठेकेदाराला कामे न करताच १४ लाखांची बीले अदा करण्यात आली. प्रत्यक्षात संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामात मोठया प्रमाणावर चुका दिसून येत आहे. मात्र तरीही अधिकार्‍यांनी संबंधित ठेकेदाराला बिल अदा केल्याने याप्रकरणी चौकशीची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाने पुरवठा विभागातील डाटा एन्ट्रीचा भ्रष्टाचार बाहेर निघण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*