Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेर: ड्राय-डे ला 27 हजारांच्या दारुसह कार जप्त; आश्वी पोेलिसांची कारवाई

Share

आश्वी (वार्ताहर)-  संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील व शिर्डी मतदार संघातील दाढ खुर्द परिसरात अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ड्राय – डे च्या काळात अवैध देशी दारूच्या बाटल्यांचा साठा करून पळणार्‍या कारचा पाठलाग करून सव्वा लाखांच्या मुद्देमालासह कार पकडण्यात पोलिसांना यश आले.

शनिवारी अयोध्येबाबतच्या निकालाने संपूर्ण राज्यात ड्राय – डे असणार्‍या शांतता व सुव्यवस्थेकरिता गावोगावी पोलिसांनी पेट्रोलिंग सुरू केली. आश्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आश्वी बुद्रुक येथील स्टेट बँकेसमोरून निघालेल्या एम. एच. 01 वाय 9651 या क्रमाकांची गडद हिरव्या रंगाच्या कारमध्ये दारूचा साठा असल्याची खबर पोलीस हेडकॉन्स्टेबल लाटे यांना मिळाली. क्षणांचा विलंब न लावता आश्वी व परिसरात पेट्रोलिंग करणार्‍या पोलीस कॉन्स्टेबल निलेश वर्पे, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद सोनवणे यांना पाळत ठेवून कार पकडण्यास सांगितले.

मात्र आश्वी येथे कारचा तपास लागला नाही. गडद हिरव्या रंगाची कार ही झरेकाठीच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वर्पे व सोनवणे झरेकाठीच्या दिशेने चौकशी करत- करत चालले होते. दरम्यान दाढ खुर्द फाट्यावर अचानक खळीकडून झरेकाठीकडे वेगाने जाणारी गडद हिरव्या रंगाची कार दिसली. वर्पे, सोनवणे व त्यांच्या मदतीस आलेले लाटे यांनी कारचा पाठलाग करून कार चालकास कार थांबण्यास मजबूर केले. चालकाची विचारपूस करत कारची झडती घेतली असता खाकी रंगाच्या बॉक्समध्ये 27,426 किंमतीच्या संजीवनी व प्रवरा कंपनीच्या देशी दारुच्या 528 सीलबंद बाटल्या आढळून आल्या.

कारचालक प्रशांत अण्णासाहेब आहेर (वय 29) रा. झरेकाठी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर यास व मारुती सुझुकी कंपनीची हिरव्या रंगाची एम. एच. 01 वाय 9651 कार (अंदाजे 7 लाख रुपये किंमत) व 27,426 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्याची तपासाणी करून ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 126/2019 नुसार महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम क्रमांक 65 (क) प्रमाणे नोंद केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल लाटे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश वर्पे, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद सोनवणे करत आहेत.

आश्वी व परिसरात शासकीय ड्राय – डे च्या काळात परवाना, विनापरवाना हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात परवाना व्यतिरिक्त देशी, विदेशी दारू विक्री होत असताना याकडे पोलिसांची डोळेझाक का? अशी चर्चा होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!