Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जिल्हा परिषद निवडणुकीत कपबशी चिन्हाला मतदान मागणारे काँग्रेसचे निष्ठावान कसे – ना. विखे पाटील

Share

आश्वी (वार्ताहर) – जिल्हा परिषद निवडणुकीत कपबशी चिन्हाला मतदान मागणारे काँग्रेसचे निष्ठावान कसे होऊ शकतात? असा सवाल महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. मतदारसंघातील विविध गावांमध्ये मतदारांशी संवाद आणि संपर्काच्या माध्यमातून मतदारांच्या गाठीभेटी त्यांनी घेतल्या. ठिकठिकाणी उत्स्फूर्त त्यांचे स्वागत करण्यात आले.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी, शिबलापूर, हंगेवाडी येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत ना. विखे पाटील यांनी युती सरकारने धोरणाची अमंलबजावणी करताना सामाजिक न्यायाची भूमिका बजावले असल्याचे सांगितले. शिर्डी विधासभा मतदारसंघात या भागातील गावांचा समावेश झाल्यानंतर विकासाच्या संधी मिळाल्या. गेली अनेक वषे निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या जमीनीचे पैसे मिळत नव्हते. पण यासाठी प्रतीक्षेत राहिलेल्या शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका आपण घेतली असे स्पष्ट करुन त्यांनी सांगितले, की युती सरकारने 22 योजनांची अंमलबजावणी करुन खर्‍या अर्थाने वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण काम केले. राष्ट्रीयकृत बँकेत शेतकर्‍यांच्या कर्जाच्या रक्कमा तातडीने जमा होतात. जिल्हा सहकारी बँकेतच उशीर का? असा प्रश्न करुन ऑनलाईन तंत्रज्ञान असतानाही शेतकर्‍यांना याबाबत अडचणी यायला नको असे मत त्यांनी व्यक्त केले.

निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामासाठी केवळ पोकळ आश्वासनं आता दिली नाहीत. जो शब्द दिला होता त्याची पुर्तता होत असल्याचे समाधान आहे. निळवंडे धरणाचे पाणी उजव्या आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना दीड वर्षात देणारच हे युती सरकारचे आश्वासन आहे. त्याची पृर्तताही होणार आहे. कारण राज्यात युती सरकारच येणार असल्याचे विश्वास त्यांनी व्यक्त केला. या जाहीर सभेस ज्येष्ठ नेते आण्णासाहेब भोसले, जि. प. सदस्या रोहिणी निघुते, सरपंच मंदाताई जाधव, नानासाहेब शिंदे, रावसाहेब घुगे, पुंजा नागरे, राजेंद्र जाधव, साहेबराव कदम आदी उपस्थित होते.

शेडगाव येथे झालेल्या सभेत ना. विखे पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. याठिकाणी झालेल्या जाहीर सभेस सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक रघुनाथ शिंदे, माजी उपसभापती विठ्ठल गायकवाड, आरपीआयचे नेते आशिष शेळके, एकनाथ नागरे, गुलाबराव सांगळे, शोभाताई नागरे आदी उपस्थित होते.

या सभेत मार्गदर्शन करताना, रघुनाथ शिंदे म्हणाले, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे. 10 वर्षापूर्वी आश्वी आणि पंचक्रोशीतील गावांना रस्तेही नव्हते. आज मात्र वाड्यावस्त्यांपर्यंत रस्त्यांची काम झाल्याने लोकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी सभापती विठ्ठल गायकवाड म्हणाले, भविष्यात राज्यात युतीचे सरकारच येणार असून, विखे पाटील यांना मंत्रीमंडळात स्थानही मिळेल. या भागातील प्रश्नांसाठी त्यांनी दिलेले योगदान विचारात घेऊन चांगल्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आरपीआयचे आशिष शेळके म्हणाले, विकास काय असतो हे विखे पाटील कुटुंबाने दाखवून दिले आहे. सामान्य माणसांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी त्यांच्या यंत्रणेतून होत असते. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना विखे पाटलांमुळे सामान्यांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी आवार्जुन नमूद केले.

शेडगाव येथे ग्रामस्थांनी महायुतीचे उमेदवार ना. विखे पाटील यांचे उत्स्फुर्त स्वागत केले. या गावातही मतदारांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी अंकुशराव कांगणे, रखमाजी खेमनर, संजय फड, गुलाबराव सांगळे, रघुनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना विखे पाटील म्हणाले, हंगेवाडी गावाचा समावेश शिर्डी मतदार संघात झाल्यानंतर या गावाचा चेहरामोहरा बदलला. विकासकामांबरोबरच या भागातील वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आपल्याला यश आले. विकास कामांमुळे या गावातील जनता आपल्या पाठीशी आहे. दबावाचे कोणतेही वातावरण निर्माण होईल, अशी परिस्थिती नाही. राज्यात युतीचे सरकारच येणार असल्याने विकासकामांना अधिक वेग येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!