Wednesday, April 24, 2024
Homeनगरकापूस विकू दिला नाही पित्याचे दगडावर डोके आपटले

कापूस विकू दिला नाही पित्याचे दगडावर डोके आपटले

खुनी मुलगा गजाआड, आश्वीची घटना

आश्वी (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे काल सोमवारी पहाटेच्या सुमारास कापूस विकू दिला नाही म्हणून जन्मदात्या पित्याचा मुलाने दगडावर डोके आपटून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. आश्वी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत आरोपीच्या पत्नीने म्हटले आहे की, आमच्या शेतात 7 ते 8 क्विंटल कापसाचे पीक आले आहे. गुरुवारी संध्याकाळी 8.30 वाजेच्या सुमारास माझे पती संतोष सोन्याबापू वाकचौरे हे घरी आले. त्यांनी आम्हाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व घरात साठवून ठेवलेला कापूस विकणार असल्याचे म्हणाला.

यावेळी सासरे सोन्याबापू किसन वाकचौरे (वय 70) यांनी पतीला दारू पिऊ नको, आपण कापूस विकू असे समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु माझ्या पतीला राग आल्याने त्यांनी कापूस पेटवण्याची धमकी देत सासर्‍याबरोबर झटापट केली. मी मध्ये गेले असता मला ही धक्काबुक्की केली. यानंतर आम्ही झोपी गेलो होतो.

सोमवारी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास बाहेर झोपलेल्या माझ्या पतीने जोरजोरात घराचा दरवाजा वाजवण्यास सुरवात केली. मी आताचं कापूस पेटवून देईन असे बोलू लागला. यावेळी माझे सासरे तेथे आले व त्यांनी माझ्या पतीला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पती संतोष वाकचौरे याने सासरे सोन्याबापू वाकचौरे यांचे डोके दगडावर आपटून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे सासर्‍याच्या डोके व कानातून रक्त येऊ लागले. मी आरडाओरड केली.

परंतू, शेजारील कोणीही धावून न आल्यामुळे मी माझ्या नातेवाईकाना फोन करुन बोलावून घेतले. यानतंर आधी सरकारी व नंतर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी सासर्‍याना दाखल केले. परंतु त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नबंर 141/2019 नुसार भारतीय दंड संहिता 302, 323, 504 प्रमाणे दाखल केला आहे.
सोमवारी सकाळी अप्पर पोलीस अधिक्षक सुनिता काळे, उपविभागिय पोलीस अधिकारी रोशन पंडित, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन पंचनामा केला केला. सहाय्यक फौजदार तात्याराव वाघमारे, एकनाथ बर्वे, शांताराम झोडंगे, अमर दाडंगे व संदीप रोकडे या पोलीस कर्मचार्‍यांनी मोठ्या शिताफीने आरोपी संतोष वाकचौरे याला ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील हे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या