नांदेडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन

0

नांदेड | नांदेड महानगरपालिकेत कॉंग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कॉंग्रेसने 51 जागांवर विजय संपादन केला आहे. मात्र भाजपला केवळ 03 जागांवर विजय मिळवता आला आहे. अजूनही येथील मतमोजणी सुरु असून कॉंग्रेसच्या १६ जागा अजूनही आघाडीवर असून भाजपच्या दोन जागा आघाडीवर असल्याचे समजते आहे.

नांदेडमधील निवडणूक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रतिष्ठेची हि निवडणूक असल्यामुळे राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून होते. नांदेड महापालिकेत बहुमत संपादन केल्यानंतर अशोक चव्हाण मुंबईत सायंकाळी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतील त्यानंतर ते भूमिका स्पष्ट करतील असे सांगण्यात आले आहे.

नांदेड येथील निवडणुकीत शिवसेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर राष्ट्रवादीला एकही जागा मिळवता आली नाही. या निवडणुकीत एक अपक्ष उमेदवार विजयी झाला असला तरी कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असल्यामुळे सत्ता स्थापन करणे सोपे झाले आहे.

LEAVE A REPLY

*