मराठा क्रांती मोर्चातून आशिष शेलारांनी पळ काढला?

0

मुंबई | आझाद मैदानावर जमलेल्या समस्त मराठा समाजाच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे आले असता त्यांना‘ आधी आरक्षण द्या मगच मोर्चात या ‘ असे खडे बोल सुनावत मोर्चेकांनी त्यांना आझाद मैदानावर येण्यापासून रोखले.

५७ ठिकाणी मूकमोर्चा झाला आजपर्यंत राज्य सरकारने काहीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे भाजप सरकारला विरोध करण्यासाठी शेलार यांना मोर्चात सहभागी होऊ दिले नाही.

अधिवेशन काळात विधान भवनाबाहेर भाजप आमदार आणि मंत्री यांनी मुंबईतील मराठामोर्चाला पाठिंबा दिला असल्याची माहिती प्राप्त होते आहे.

काही आंदोलकांनी आशिष शेलार यांच्या दिशेने बाटल्या फेकून मारल्याचे समजते. आंदोलकांचा संताप बघता शेलारांनी येथून काढता पाय घेतला.

दरम्यान, आशिष शेलार यांनी संपूर्ण आरोप फेटाळून लावले आहेत. मराठा क्रांती मोर्चा संयोजकांनीदेखील शेलार यांना धक्का बुक्की झाली नसल्याचा निर्वाळा केला आहे.

LEAVE A REPLY

*