Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रआषाढी वारी : वीस वारकर्‍यांसोबत माऊलींची पालखी पंढरपूरला न्या

आषाढी वारी : वीस वारकर्‍यांसोबत माऊलींची पालखी पंढरपूरला न्या

सार्वमत

आळंदीच्या ग्रामस्थांनी पंढरपूर देवस्थानला सुचविला पर्याय
पुणे (प्रतिनिधी) – आषाढी वारीचा पालखी सोहळा वद्य अष्टमी म्हणजेच 13 जून रोजी करु नका, त्याऐवजी थेट आषाढ शुद्ध दशमी म्हणजे 30 जून रोजी मोजक्या वीस वारकर्‍यांसोबत माऊलींची पालखी पंढरपूरला न्या, असा पर्याय आळंदीच्या ग्रामस्थांकडून सुचवण्यात आला आहे. आळंदीच्या रहिवाशांनी सह्यांचे निवेदन पंढरपूर देवस्थानला दिले आहे. सोहळा वाटेत कोठेही न थांबता थेट पंढपूरला न्या, अशी सूचनाही करण्यात आली आहे. वारकर्‍यांच्या सूचनांवर पंढरपूर देवस्थान काय निर्णय घेतं यावर यंदाचा पाळी सोहळा कसा होणार हे ठरणार आहे.

- Advertisement -

पंढरपुरातील आषाढी एकादशी सोहळ्यावर कोरोनाफचं सावट आहे. यंदा आषाढी वारी फक्त वीस वारकर्‍यांच्या सोबत करा, असा पर्याय आळंदीच्या ग्रामस्थांनी पंढरपूर देवस्थानला सुचवला आहे. सरकारच्या नियमानुसार आषाढी एकादशीला (1जुलै) प्रदक्षिणा, द्वादशीचे पारणे फेडून पालखी पुन्हा आळंदीकडे मार्गस्थ करावी, असा पर्यायही निवेदनात सुचवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी आळंदी देवस्थानने आषाढी वारीसंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती. त्या अनुषंगाने यंदाच्या वर्षी सोहळा कशा स्वरुपात पार पाडावा याबाबत दिंडीकरी, फडकरी आणि वारकर्‍यांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्रभरातून मानाच्या सात पालख्यांसह छोट्या-मोठ्या शंभर ते दीडशे पालख्या आणि अंदाजे पंधरा ते वीस लाख वारकरी हे दरवर्षी मजल दरमजल करत आषाढी वारीला पंढरपूरला जात असतात. मात्र, या वर्षी पंढरपूर वारीवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे वारकर्‍यांनीही घरुनच पंढरीच्या विठुरायाला नमस्कार करण्याचा आदर्श निर्णय घेतला आहे.

सोहळ्यात पालखी सोहळा मालक, प्रमुख विश्वस्त, पालखी सोहळाप्रमुख, चोपदार, मानकरी, शिपाई, दिंडीकरी, विणेकरी, टाळकरी, पखवाद वादक, झेंडेकरी, तुळस घेणारी महिला वारकरी आणि पुजारी अशा मोजक्याच लोकांचा सहभाग असावा. माऊलींच्या पादुका ट्रकमधे किंवा सजवलेल्या रथात ठेवाव्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या