Type to search

हिट-चाट

पंढरपूरच्या वारीमध्ये ‘झी टॉकीज’चाही सहभाग

Share

मुंबई : उत्तमोत्तम चित्रपटांसह, ‘गजर कीर्तनाचा’सारखे कीर्तनाचे कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येणारे ‘झी टॉकीज’ यंदा या विठ्ठल भक्तांसाठी काम करणार आहे. त्यांना गरजेच्या असलेल्या काही सोयीसुविधा ‘झी टॉकीज’ त्यांना पुरवणार आहे. वारीचा प्रवास सुखाचा व्हावा याची काळजी झी टॉकीजकडून घेण्यात येणार आहे.

कीर्तन हा यातील एक महत्त्वाचा भाग असतो. हे लक्षात घेऊन, ‘झी टॉकीज’ या वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी कीर्तन करण्याकरिता जागेची व्यवस्था करणार आहे. याशिवाय वारकऱ्यांसाठी ३ लाख आरतीसंग्रहांचे वाटप ‘झी टॉकीज’कडून करण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाण्याचे टँकर्स या मार्गावर उपलब्ध करून देण्याचे काम सुद्धा वाहिनीच्या मार्फत होणार आहे.

कुठल्याही वारकऱ्याला वैद्यकीय मदतीची गरज पडल्यास, ‘झी टॉकीज’ने उभारलेल्या प्रथमोपचार केंद्रांचादेखील लाभ घेता येईल. विठ्ठल भक्तांचा हा वारीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वाहिनीची टीम झटणार आहे. सर्व सोयीसुविधांच्या बरोबरीने आणखी एक आनंदाची बाब म्हणजे, ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणारी दीप्ती भागवत वारीत सहभागी होणार आहे.

वारकऱ्यांच्या बरोबरीने संपूर्ण वारीचा आनंद दीप्ती घेणार आहे. सर्वांचं लाडकं ‘झी टॉकीज’ या वारीच्या निमित्ताने आणखी आपुलकीचं होऊन जाणार आहे. याविषयी बोलतांना झी टॉकीजचे बिझिनेस हेड भावेश जानवलेकर म्हणतात;

३ लाख हरिपाठ पुस्तकांचे वाटप वारकऱ्यांसाठी करण्यात येणार आहे. जिथे वारकरी विश्राम करतात त्या जागेत झी टॉकीजवरील ‘मन मंदिरा’ या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. वारकरी विठूमाऊलीची सेवा करत असतांना, त्यांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला मिळणे, ही आमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!