Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

उपवास करताय पण जरा जपून….

Share

नाशिक : आषाढी एकादशी म्हटलं कि वारी, विठ्ठल, पंढरपूर, वारकरी, अशा अनेक गोष्टींबरोबर आठवतो तो म्हणजे उपवास होय. अनेक लोक आठवड्यातून एक दिवस उपवास करतात. साधारणतः पोटाला आराम मिळावा हि त्यामागची भावना असते. परंतु उपवास करताना अनेक गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते.

असं म्हटलं जात उपवास असला कि इतर दिवशी पेक्षा अधिक खाल्लं जात किंवा खायला मिळत. पण काहीवेळा हेच अतिखाल्लेल आरोग्यावर परिणाम करत. पण उपवास म्हणजे काय ? तर आठवड्यातून एक दिवस पोटाला आराम मिळावा म्हणून हा दिवस. परंतु याच दिवशी विविध पदार्थांवर ताव मारला जातो. परंतु यामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी काळजी घेणे आवश्यक असते. अशावेळी काय काळजी घ्यावी?

  • उपवास याची साधी सरळ व्याख्या म्हणजे पोटाला आराम देणे असे असून या दिवशी आपल्या जेवणात हलक्या पदार्थाचा समावेश असायला हवा.
  •  उपवास म्हटलं सगळीकडे साबुदाण्याची खिचडी स्पेशल असते. यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असल्याने जास्त खाल्ल्यास पोटाचा रस होऊ शकतो.
  • उपवासाच्या विविध पदार्थ दाण्यांनी तयार केलेले असतात. या मध्येही कॅलरीज मोठ्या प्रमाणावर असतात. याचेही मर्यादेत सेवन करावे.
  • तसेच उपवासाच्या काहीच खायचं नाही हे देखील चुकीचे ठरते. कारण यामुळे शरीराला त्रास होण्याची शक्यता असते.
  • खजूर, राजगिरा, रताळे, सुकामेवा हे पदार्थ उपवासाच्या दृष्टीने चांगले. त्यामुळे शरीरात त्राण टिकून राहतो आणि त्रास होण्याची शक्यताही कमी असते.
  • उपवासाच्या दिवशी आहारात मुख्यत्वे फळांचा समावेश अधिक असावा. यामुळे भूकही क्षमते आणि शरीरात ऊर्जा टाकून राहण्यास मदत होते.
  • उपवास शक्यतो सामान्य व्यक्तींनी धरावा . आजारी किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी उपवास धरू नये. तसेच आपल्या आहारात शीतपेयांचा वापर अधिक करावा . जसे कि, ताक, दूध, शहाळं पाणी, लिंबू सरबत.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!