Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

आशा व गटप्रवर्तक कर्मचार्‍यांचा तहसीलवर मूक मोर्चा

Share

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – आशा व गटप्रवर्तक कर्मचार्‍यांना मानधनाऐवजी वेतन देण्यात यावे त्यांना शासकीय कर्मचार्‍याचा दर्जा द्यावा, राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करावी, यामागण्यांसाठी पंचायत समिती ते तहसील कार्यालयापर्यंत तोंडावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढून नायब तहसीलदार शोभा माळी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

राज्यातील 70 हजार आशा व गटप्रवर्तक महिलांना 1500 रुपये या तुटपुंजा मानधनावर राबवून घेण्यात येत आहे. आशा व गटप्रवर्तकांना मानधन नको त्यांना वेतन श्रेणी देऊन शाससकीय दर्जा द्यावा, आशा कर्मचार्‍यांना 15 हजार रुपये तर गटप्रवर्तक महिलांना 10 हजार रुपये वेतन मिळावे. या सर्वांचे मानधन तिप्पट करण्याच्या आचारसंहितेपूर्वी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करून शासन निर्णय काढण्यात यावा, या मागण्यांसाठी गेल्या 3 सप्टेंबरपासून राज्यात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश सरकार आशा स्वयंसेविकांना महिन्याला 10 हजार रुपये मानधन देते. महाराष्ट्र सरकाने ते द्यावे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी अनेक वेळा मोर्चा काढून निवेदने दिली. त्यामुळे काल पंचायत समितीमधून शिवाजी चौक, क्रांती चौक, आंबेडकर चौक, गाडगे महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आला.

या मोर्चाचे नेतृत्व माजी प्राचार्य शिवाजीराव देवढे, संजय नांगरे, शशिकांत कुलकर्णी, अशोक नजन, भगवान गायकवाड, संजय डमाळ यांनी केले. या मोर्चात समा सय्यद, संध्या पोटफोडे, कावेरी मिसाळ, मंगल गर्जे, अंजली भुजबळ, वैशाली झिरपे, सुनिता सोनटक्के, संगिता पिसोटे, भाग्यश्री घाडगे, अंजली भुजबळ, वैशाली वाघुले, ज्योती डोंगरे, सिंधु जरांगे, वैशाली सोलेकर, सिमा घुगे, राणी नारळकर, वैशाली सोनवणे, स्वाती शिरसागर, शीतल थोरवे, सुलभा महाजन आदीं सहभागी झाल्या होत्या.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!