नव्वदीतल्या आजीबाईंनी सुरु केली ‘शॉपिंग’ वेबसाइट

0

आसाम : व्यक्तीच्या जीवनात एखाद स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही वयाची गरज नसते. अन कोणत्याही वयामध्ये स्वप्न पाहयावयास देखील बंदी नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे लतिका चक्रवर्ती. वयाच्या ८९ व्या वर्षी लतिका यांनी स्वतःची ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट सुरु केली असून याद्वारे लतिका स्वतः शिवलेल्या पिशव्या विकत आहेत. बनवलेल्या प्रत्येक पिशवीला एक विशेष नाव देखील देतात.

आसाममधील धुब्री येथे राहणाऱ्या लतीका चक्रवर्ती यांनी सरकारी अधिकारी असलेल्या कृष्ण लाल चक्रवर्ती यांच्याशी विवाह केला. त्यांच्या मृत्यूनंतर लतिका आपला मुलगा भारतीय नौदल कॅप्टन राज चक्रवर्तीबरोबर रहायला सुरुवात केली. आपल्या जीवनात त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवास केला आणि प्रवास करताना साडी आणि कुर्ती सारख्या सारखे अनेक कपडे विकत घेतले. या कपड्यांवर केलेल्या नक्षी कामाने त्या खूप प्रभावित झाल्या. या वरून त्यांनी ते स्वतः डिझाइन करायचं ठरवलं. तिच्या मुलांसाठी देखील त्याच कपडे शिवत असत. परंतु आता हे प्रेम त्या पिशवीमार्फत लोकांपर्यंत पोहचवत आहेत.

2014 पासून, त्यांनी या पिशव्या बनवण्यास सुरुवात केली आणि 300 पेक्षा जास्त पिशवी तयार केल्या आहेत. ह्या पिशव्या आपल्या इतर उरलेल्या कपड्यातून बनवत असतात. एखाद्या कार्यक्रमा प्रसंगी मित्र आणि कुटुंबियांना या पिशव्या भेट करीत असते.

या त्यांच्या स्वभावामुळे त्यांना भरभरून प्रेम, आपुलकी मिळत असते. याच पिशव्या त्या ऑनलाईन विकत असतात. Latikasbags.com नावाची एक वेबसाइट आहे, जी तिचे नातू जर्मनीमधून चालवतात. या पिशव्याची किंमत डॉलरमध्ये आहे.
लतिका ब्लॉग लिहतात, परंतु त्यांची ब्लॉग लिहण्याची शैली इतरांपेक्षा वेगळी आहे. कारण त्या ब्लॉग एका कागदावर लिहून मग कागदाचं ब्लॉगर वर अपलोड करत असतात. खर तर स्वप्नांना वेळ, मर्यादा, वय यांचं भान नसत हेच या आजीबाईच्या बटव्याकडून शिकायला मिळेल.

LEAVE A REPLY

*