केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींना कॅन्सर; उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना

0
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ असून त्यावर तातडीनं उपचार न केल्यास शरीराच्या इतर अवयवांनाही त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जेटली ताबडतोब न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत.

जेटली यांच्यावर याआधीच मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे जेटलींवर पुन्हा शस्त्रक्रिया करण्याबाबत डॉक्टर साशंक असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. नव्या शस्त्रक्रियेमुळे त्यांच्या मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे

अरुण जेटलींच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मूत्रपिंड प्रत्यारोपणामुळे निर्माण झालेल्या अडचणी पाहता सर्जरी करुन लगेच डिस्चार्ज देणं रुग्णालयाला शक्य होणार नाही. दरम्यान अरुण जेटलींच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प कोण मांडणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. गतवर्षी मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अरुण जेटली सुट्टीवर होते तेव्हा त्यांच्या वतीने पियूष गोयल यांनी अर्थसंकल्प मांडला होता.

LEAVE A REPLY

*