कला-क्रीडा शिक्षकांच्या तासिका पूर्ववत

0

शारीरिक शिक्षण बचाव व कृती समितीच्या प्रयत्नांना यश

अहमदनगर : कला, क्रीडा विषयाच्या तासिका पूर्ववत करण्यात आल्या आहेत. कला क्रीडा शिक्षकांनी राज्यव्यापी आंदोलन उभे केल्याने शासनाला झुकावे लागले. दि. 23 ऑगस्ट रोजी कला-क्रीडा शिक्षक संघटनांसोबत झालेल्या बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी तासिका पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला होता. पण परिपत्रक निघण्यास उशीर झाल्याने कला क्रीडा शिक्षक हवालदिल झाले होते. परिपत्रक निघल्याने कला-क्रीडा शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पेढे वाटून त्यांनी हा आनंद साजरा केला.
शासनाविरोधात आंदोलनाद्वारे राळ उठविण्यात आली होती. हे आंदोलन यशस्वी करण्यात क्रीडा महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, राज्य समन्वयक आप्पासाहेब शिंदे, सचिव शिवदत्त ढवळे , संजय पठाडे, डॉ अरुण खोडस्कर , विनोद इंगोले , प्रल्हाद साळुंके, प्रल्हाद शिंदे, . वेणुनाथ कडू , घनशाम सानप, पुरुषोत्तम उपर्वट, लिंबकर जितेंद्र यांनी महत्वाची भूमिका बजावली.
लढा यशस्वी करण्यासाठी योगदान देणार्‍या पदाधिका-यांचे मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित , राज्य कीडा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील गागरे, सचिव शिरीष टेकाडे, राज्य संघटक महेंद्र हिंगे, नितीन घोलप , बाबा बोडखे, अशोक डोळसे ,भानुदास तमनर, विजय जाधव , दत्तात्रय नारळे, सुनील जाधव, अनिल पटारे, राजेंद्र कोहकडे,बाळासाहेब कांडेकर , सोपान लांडे, प्रताप बांडे, बबन गायकवाड, भरत बिडवे, शंकर बारस्कर, दिलीप काटे, दत्ता नेवसे , आदिनाथ पाचपुते , तुवर पाटील, शिवाजी वाबळे, बळीराम सातपते, संजय कंगले, दिनेश भालेराव, शिवप्रसाद घोडके , गणेश म्हस्के व समस्त क्रीडा शिक्षकांनी अभिनंदन केले.

वेळापत्रकात असा होणार बदल
सोमवार ते गुरुवार पूर्वीप्रमाणे 8 तासिका राहतील. शुक्रवारी व शनिवारी प्रत्येक तासिकेचा वेळ 5 मिनीटांनी कमी केल्याने शुक्रवारी एक तासिका वाढून 9 तासिका होतील. शनिवारी कमी केलेल्या वेळेत एक तासिका वाढेल व आणखी एक तासिका वाढविण्यात आल्याने 5 ऐवजी 7 तासिका होतील. आठवडयाच्या एकूण कार्यकाल 25 मिनीटांनी वाढणार आहे.आरोग्य व शारीरिक शिक्षणास 6 वी ते 8 वी 4 तासिका 5 वी, 9वी व 10 वी साठी आठवड्याला 3 तासिका देण्यात आल्या आहेत. कलेसाठी 6 वी ते 8 वी 4 तासिका, 5 वी व 9 वी साठी 3 तासिका देण्यात आल्या आहेत.9 वी,10 वी इंग्रजी विषयाला 1 व 5 वी ला गणित इंग्रजी विषयाला 1-1 तासिका आठवड्याला वाढवून देण्यात आली असून कला व शारीरिक शिक्षणाबरोबर इतर विषयांकडे लक्ष देण्यात आले आहे.

एकजुटीचा विजय
सर्वांच्या एकजुटीचा हा विजय आहे. पुणे येथे धरणे आंदोलन, बैठा सत्याग्रह केला. विशेष अधिवेशन काळात शिक्षणमंत्री,विरोधी पक्षनेते यांना भेटून निवेदने दिली. सरकार दाद देत नसल्याने शालेय स्पर्धेवर बहिष्कार टाकून स्पर्धा बंद केल्या. फुटबॉल वन मिलियन या पंतप्रधानांच्या ड्रीम प्रोजेक्टवर बचाव कृती समितीने बहिष्कार टाकला होता.

-राजेंद्र कोतकर, राज्याध्यक्ष, क्रीडा महासंघ.

LEAVE A REPLY

*