कृत्रीम रेतनात खासगी संस्थांना आवरा; जि.प.पशु संवर्धन विभागाला उपाध्याक्षांची सूचना

0
नाशिक । ग्रामीण भागात पशू कृत्रीम रेतन करून देणार्‍या खासगी संस्थांचा सुळसुळाट झालेला आहे. या प्रकारावर जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने आळा घालावा, असे निर्देश जिल्हा परिषद उपाध्यक्षा व पशू संवर्धन समिती सभापतींनी पशू संवर्धन अधिकार्‍यांना आढावा बैठकीत दिले.

पशू संवर्धन समितीची आढावा बैठक उपाध्यक्षा नयना गावित यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी समिती सदस्य समाधार हिरे, साधना गवळी, प्रतिभा सूर्यवंशी, संगिता निकम, यांच्यासह पशू संवर्धन अधिकारी पाटील आदी उपस्थित होते.

नाविण्यपूर्ण योजनेचा लाभार्थी निवडताना पशू संवर्धन विभागाने जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांची शिफारश घ्यावी, असा ठराव बैठकीत करण्यात आला. त्याचबरोबर विभागात वर्ग एकच्या अधिकार्‍यांची 27 पदे रिक्तआहे. ही पदे शासनाने भरावीत, यासाठी ठराव करण्यात आला.

आदिवासी भागात कुपोषण दूर करणे, तसेच रोजगार मिळवून देणार्‍या स्वयंम या योजनेची अंमलबजावणी करण्यात याचवी, असे आदेश यावेळी देण्यात आले. आदिवासी बालकांचे कुपोषण दूर करून त्यांना अंडी, मांस उपलब्ध करून देणारी ही योजना असल्याने, या योजनेची प्रभावी अंमलबजावणी आदिवासी भागात करावी, असे यावेळी सदस्यांनी सूचवले.

LEAVE A REPLY

*