Type to search

फिचर्स संपादकीय

भूमिपुत्रांच्या विकासाचा मंत्र; ठिबक सिंचन

Share

जैन इरिगेशनचे संस्थापक आदरणीय भवरलालजी जैन तथा मोठेभाऊ यांचा आज दि.25 फेब्रुवारीला श्रद्धावंदन दिन. त्यानिमित्त वरिष्ठ सहकारी यांनी लिहिलेला लेख….

व्ही .बी.पाटील ,एम.एस्सी.(कृषी)
वरिष्ठ व्यवस्थापक, कृषी संशोधन व प्रशिक्षण ,जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि., जळगाव

 

न ठिबक सिंचन म्हणजे काळाची गरज अन् भरीव शेती उत्पादन वाढीचा दूरगामी उपाय. हे कठीण कर्म ज्या भूमिपुत्राने भारताच्या शेतीत, मातीत रुजविले ते महान कर्मयोगी कृषिसाधक डॉ. भवरलालजी जैन यांनी जैन इरिगेशन कंपनीद्वारे हे कार्य केले. गेल्या 39 वर्षांपासून मातीशी इमान राखून शेती, शेतकरी व शेतीनिष्ठ व्यवस्थापनाला समर्पित अशी भूषणावह त्यांची कर्तबगारी आहे. बी-बियाणे, खते, जंतुनाशके, ट्रॅक्टर्स, पपेन, विद्राव्य खते, टिश्युकल्चर रोपे, पीव्हीसी-पीई पाईप आणि कार्यक्षम दर्जेदार ठिबक यंत्रणा, करार शेती, भाजीपाला व फळ प्रक्रिया, सोलर पंप अशा चढत्या क्रमानं शेतीशी जैन उद्योग समूहाची बांधिलकी सिद्ध केली आहे मोठ्याभाऊंनी.

निसर्गाने दिलेले पाण्याचं वरदान, मुक्त व मुफ्त नाही… अनादि वा अनंत नाही… हे आता सर्वसामान्यांना उमगू लागलय. पीक, पाणी, माती व हवामान यंच्या पारस्पारिक संबंधाचा नीट अभ्यास करून पिकाच्या या गरजे इतकच पाणी, थोडं थोडं थेंबाच्या रूपाने ठराविक मात्रेत देणे ही सिंचनाची आधुनिक पद्धती म्हणने “जैन ठिबक पद्धती” ही पद्धती कार्यक्षम अन् सर्व प्रकारच्या जमिनी, पाणी, हवामान व विविध पातळ्यांवर यशस्वी झाली. 80-85 प्रकारच्या पिकांना वरदान ठरली.

भवरलाल भाऊंनी अमेरिकेतील फ्रेस्नो येथे 1984 साली हे प्रगत तंत्रज्ञान पाहिले, प्रदर्शनाला प्रत्यक्ष भेट दिली, अभ्यास केला, तंत्रज्ञानाची पारख केली आणि आपल्या भारत भूमीला हे वरदान ठरेल अशी खूणगाठ मनाशी पक्की केली. भारतात परत येताना सोबत ठिबकची पुस्तके, माहितीपत्रके, नमुने (नळ्या, तोट्या इ.) यांची शिदोरी घेऊन आलेत. उद्योग समूहातील तांत्रिक सहकार्‍यांना याचा सखोल अभ्यास करायला लावला आणि 1985-86 साली ऑस्ट्रेलियान कंपनी सोबत करार करून हे तंत्रज्ञान भारताच्या शेतीत प्रत्यक्ष उतरविले. “आधी केले मग सांगितले”, या उक्तीप्रमाणे जैन हिल्स जळगाव या परिसरात यासाठी प्रगत कृषी संशोधन व विकास केंद्र सुरू केले. माती-पाणी पीक यांचे नाते जोडले. तसेच शासन दरबारी ह्या नवीन प्रगत तंत्रज्ञानाला शासकीय मान्यता प्राप्त करून दिली. जगातील इतर देशामध्ये केली जाणारी प्रचंड मोठी एकत्रित शेती (क्षेत्र हजारो एकरावर असते) त्यामधील ठिबकचे तंत्रज्ञान भारतातल्या छोट्या अल्प भूधारक शेतकर्‍याच्या शेतीत रूजवितांना फार बदल केले. यासाठीच भाऊंनी आपले जीवन वाहून टाकले. अडचणीचे डोंगर पार करीत ठिबक प्रणाली भारताच्या भूमीत 80-85 प्रकारच्या विविध पिकावर यशस्वी केली. केवळ उत्पादन करून ठिबक-पाईप-स्प्रिंकलर विक्री करणारे व्यावसायिक-उद्योजक यापेक्षा पाणी हा अनमोल नैसर्गिक ठेवा शेतीत कसा वापरावा हा मंत्र शेतकर्‍यांना दिला. फळझाडे, भाजीपाला, नगदी पिके, फूल शेती, धान्य पिके या पिकांत ठिबक तंत्रज्ञान यशस्वी ठरले. शेतकर्‍यांचे उत्पादन दुपटीने वाढले, पाण्याची-उर्जेची बचत तर झालीच पण शेतीवरील खर्च कमी होऊन उत्पादनासोबत उत्पन्नही पण वाढले. शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक व सामाजिक क्रांती घडवून आणली.

जैन ठिबक तंत्रज्ञानात महाराष्ट्र अग्रेसर राहिला. त्यासोबत कर्नाटक, आंध्र, तामीलनाडू, गुजराथ, मध्यप्रदेश या प्रांतामध्ये हे मोठ्या प्रमाणावर स्वीकारले गेले. या प्रांतामधील आणि विशेषतः जळगाव जैन हिल्स येथील पीक प्रात्यक्षिके बघून छत्तीसगड, आसाम, ओरिसा, हिमाचल प्रदेश, हरियाणा या प्रांतामध्ये ही प्रणाली अवलंबली जात आहे.

शेतकर्‍यांना हे तंत्रज्ञान त्वरीत आत्मसात करता यावे म्हणून जैन हिल्सवर जळगावच्या येथे एक हजार एकरावरील पीक प्रात्यक्षिक केंद्रासह एक आधुनिक उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र सुरू केले ज्या ठिकाणी दरवर्षी 40-50 हजार शेतकरी नवीन शेती प्रगत तंत्रज्ञानाचे, प्रशिक्षणाचे धडे घेऊन आपल्या शेतावर हे तंत्रज्ञान राबवीत आहेत. ङरल ीें ङरपव हा कार्यक्रम याद्वारे प्रभावीपणे राबविले जात आहे.
शेती व शेतकरी यांचेशी शेती प्रगत तंत्रज्ञानातून नाते घट्ट करताना भवरलाल भाऊंसमोर शेतकर्‍यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या त्या म्हणजे शेती मालाचे फळझाडांचे, भाजीपाल्याचे उत्पादन जैन ठिबक, जैन पाईप पद्धतीने वाढविले या वाढीव उत्पादनाला हमीची बाजार पेठ पाहिजे. यासाठी मोठ्याभाऊंनी भाजीपाला व फळ प्रक्रिया उद्योग सुरू केले ज्याद्वारे शेतकर्‍यांना हक्काची हमीची बाजारपेठ उपलब्ध झाली. तसेच काही पिकामध्ये जसे केळी, डाळिंबसाठी दर्जेदार रोपे उपलब्ध नव्हती. त्यासाठी
मोठ्याभाऊंनी उती संवर्धन प्रयोगशाळा उभी करून दर्जेदार उत्ती संवर्धित (टिश्युकल्चर) रोपे शेतकर्‍याना रास्त दरांत उपलब्ध करून दिलीत. शेतकर्‍यांना शेतावर कृषी ज्ञान उपलब्ध करून दिले.

शेती आणि शेतकरी यासाठी अविरत कष्ट करणारे ऋषितुल्य कर्मयोगी भवरलाल भाऊंनी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत भरीव काम केले. शेतकर्‍यांना प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यांचा सन्मानही केला. स्व. वसंतरावजी नाईक, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या सत्कार्यामुळे शेती आणि शेतकर्‍यांच्या जीवनात परिवर्तनाची नांदी ठरली. कृषिक्षेत्रातील समर्पित कर्मयोगी व्यक्तिमत्त्वास शतशः कोटी प्रणाम!
“जय किसान; जय विज्ञान!”

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!