Type to search

फिचर्स संपादकीय

बहिणाईच्या ओटीतील साधा माणूस.. अन् व्हिजन कुलगुरु

Share

पुरुषोत्तम गड्डम – भ्रमणध्वनी – 9545465455

प्रसंग पहिला …
तू प्यार का सागर है,
तेरे एक बुंद के प्यासे हम…

आलीशान सरकारी इनोव्हा गाडीतून या नादब्रह्म गीताचा आवाज घुमत असतांनाच, चकचकीत रस्त्यावरुन यूटर्न घेत गाडी चिंचोळ्या खडबडीत रस्त्यातून नाचू लागली. अंड्याला आलेल्या कोंबडीगत गाडी कचकन थांबली अन ‘गाडी पुढे जाणं जरा कठीणच आहे!’ असं म्हणत चालकाने स्टेरींग धरलेल्या उजव्या हातावर बसलेल्या मच्छराला डाव्या हाताने पछाडले… झोपडपट्टीच ती, नाल्यावर, गटारीवर झोपडीवजा घरे… घाण… कचरा… दुर्गंधी… आणि असल्या वातावरणातही पेटलेल्या उदबत्तीने हातातील लवंगी फटाके फोडून दिवाळी साजरी करतानाची फाटक्या कपड्यातील दिलखुश पेारं बघून साहेबही आनंदी झाले! गाडीच्या खिडकीतूनच आवाज देत त्यांना आपल्या कर्मचार्‍यांच्या घराचा पत्ता एकाला विचारला… झोपडपट्टीच्या पलीकडे एका बर्‍यापैकी परिसरात चिंचोळ्या गल्लीतील चौकीवजा घरासमोर गाडी थांबली आणि साहेबांनी विद्यापीठातील आपल्या सफाई कर्मचार्‍याला जोरदार हाक मारली… तसा सफाई कर्मचारी आश्चर्याच्या सुखद धक्क्क्यातून गाडीसमोर आदळला, ‘साहेब…. तुम्ही आणि इथं… का काय झालं? असं म्हणून कर्मचार्‍यांची चांगलीच भंबेरी उडाली… विद्यापीठाचे कुलगुरु दिवाळीचा फराळ अन मिठाई घेऊन आल्याचे पाहून त्याचे डोळे पाणावले! साहेबांनी थेट खांद्यावर ममत्वाचा हात ठेवून त्याच्या हाती दिवाळीचे शुभेच्छा कार्ड दिले… अन फराळाचे व मिठाईचे पाकीट कर्मचार्‍याच्या बायकोच्या हाती देत, निरोप घेतला!’

दुसरा प्रसंग… विद्यापीठीय क्रीडामहोेत्सवासाठी खेळाडू विद्यार्थ्यांची मांदियाळी आवारात गर्दी करीत होती. कुलगुरु असले तरी थेट जमिनीवर राहून विद्यार्थ्यांमध्ये रमणारा हाडाचा प्राध्यापक म्हणून साहेबांची ओळख! म्हणूनच तर कुलगुरु पदाचा पदभार स्विकारण्यासाठी कोणताही ताम-झाम न करता विद्यार्थ्यांच्या घोळक्यात साहेब कार्यालयापर्यंत चालत गेले होते. आकाशी झेप घेणारा पक्षी जमिनीवरही किती सहजपणे वावरतो. हे नितळ मनाच्या सार्‍याच सहकार्‍यांना ठाऊक आहे… क्रीडा महोत्सवासाठी मैदानावर फिरतांना कुलगुरु साहेबांची नजर काही धावपटू असलेल्या विद्यार्थिनींकडे गेली आणि बघतो तर काय…? पोरींच्या पायात, ना पायतण, ना स्पोर्टस शुज… कुठून आलात? म्हणताच, पोरी आदिवासी स्टाईलनं कोकलल्यात… विसरवाडी, नंदुरबार जिल्हा…. विसरवाडीतून येतांना स्पोर्टस शूजही विसरलात का? या कुलगुरुंच्या मिश्किल प्रश्नाला पोरी उत्तरल्या, ‘महाग असत्यात… परवडत नाय!’ आणि पोरी पुन्हा धावायच्या सरावाला लागल्यात! कुलगुरुंच्या मनी कालवाकालव झाली… विसरवाडीतील मुलींच्या कोचला शोधून त्यांना पैसे देत कुलगुरुंनी स्पोर्ट शुज मागावून घेतले. आणि मगच तृप्त मनानं कार्यालयाकडे निघाले!

प्रसंग तिसरा… पदवीप्रदान समाराभाला अमेरिकेतील सुप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी चिफगेस्ट होते. आणि ‘पॉवर पॉईंट’द्वारा विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. विशेष म्हणजे कार्यक्रमात पिन ड्रॉप सायलेन्सची अनुभूती येत होती. दरम्यान पदवीप्रदान सोहळा सुरु झाला आणि सडपातळ अंगकाठीचा…चेहर्‍यावरील रया गेलेला एक सामान्य विद्यार्थी आपल्या नावाची घोषणा होताच उठला! बाजुला त्याचे माय-बाप अनाकलनीय भावमुद्रा लेऊन बसलेले… कुलगुरुंनी लांबूनच खुणावले…. तसा माय-बापास घेऊन विद्यार्थी व्यासपीठावर आला! अनवाणी पायान आलेल्या नवापूर जवळील पाड्यावरील लुगड घातलेल्या त्या पन्नाशीतील लक्ष्मीची थरथरणारी पावलं अन कळकटलेल्या धोतराचा सोगा सांभाळत पोराच्या मागं वायजळ होऊन भेगा पडलेली पावलं टाकत जाणारा बाप पाहून उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या! पोराच कौतुक बघण्यासाठी सुशिक्षित माय-बाप तर येताच, पण खेड्या-पाड्यावरील कष्ट उपसणारे माय-बापसुध्दा आपल्या पोरांच कौतुक करण्यासाठी आसुरले असतात, त्यांच्याही डोळयाच पारणं फेडावं… ही संकल्पना राबविणारा साधा माणूस म्हणजे कवियित्री बाहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. पी. पी. पाटील होय!… असे एक-ना अनेक प्रसंग कुलगुरुंच्या आयुष्यातून ऊसवून घेता येतील. पण हा ममत्वाचा धागा त्यांच्या आयुष्यात लहानपणीच विणला गेला.
बापाच्या खस्तांमुळे जमिनीवर!

कुलगुरु डॉ. पी. पी. पाटील मुळचे भुसावळजवळील अंजाळे गावातील! घरात खाणारी 7-8 माणसं.. वडील रेल्वेच्या किरकोळ नोकरीत हाडाची काडं करायचं. नोकरीतील ओव्हरटाईम बापाची अन पोरांची भेट हेाऊ देत नव्हता. पण मुलं हुषार… कधी-कधी छोटा प्रदीप वडिलांचा डबा घेऊन रेल्वेच्या लोकोशेडमध्ये जायचा. तेथे एक साहेब होते. ते प्रदीपला काही प्रश्न विचारायचे, छोटा प्रदीप हुशारीने उत्तरे द्यायचा! दहावीत असतांना एकदा साहेब वडिलांना बोलला…“तुम्हारे बच्चे जीनिअस है, इनको पढाओ… नाम करेंगे तुम्हारा!” वडिलांनी परिस्थितीच गार्‍हाणं मांडलं पण त्यावरही साहेबांनी सल्ला दिला. रेल्वे विभागाच्या पुण्याच्या होस्टेलमध्ये भावाचा नंबर लागला… नंतर प्रदीपचाही… देशभरातून केवळ 38 विद्यार्थी मेरीटवर निवडायचे… त्यात नंबर लागला आणि फिजिक्स विभागात पारंगत होऊन प्रदीप ते कुलगुरु डॉ. पी. पी. पाटील असा त्यांचा प्रवास घडला. हा प्रवास खडतर होता चार भावांपैकी तिघांचे पाय एकाच मापाचे होते. म्हणून बाबा एकच चपलेचा जोड घेऊन द्यायचे व ही एकच चप्पल तिघे भाऊ आलटून-पालटून वापरत. नंतर कमावते झाल्या-झाल्याच वडिलांना व्हीआरएस. घ्यायला लाऊन अखेरपर्यंत सेवा केली. बापाच्या या खस्ताहाल आयुष्यामुळेच आपण आणि भाऊ घडल्याचे कुलगुरु
नम्रपणे सांगतात!

विद्यापीठ बदलविलेले अंतर्बाह्य

1) अभ्यासविषयक नूतनीकरण (अ लरवशाळल खपपर्रींरींळेपी) – हा कार्यक्रम कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी प्रथमत: हाती घेतला. यामध्ये खपींशश्रश्रशर्लीींरश्र झीेशिीीूं ठळसहीं (खझठ) उशश्रश्र स्थापन करून प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांचेही ‘पेटंट’ जवळ करण्यासाठी प्रयत्न झालेत. 2018 पासून ऑनलाईन अ‍ॅडमिशन सिस्टम विकसित करून ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांची पायपीट आणि पैसा बचत करण्यासाठी प्रयत्न झालेत.

2) विद्यार्थी केंद्रीत उपक्रम (र्डीींवशपीं उशपीींळल खपर्पेींरींर्ळींश झीर्रीींंळलशी)- विद्यापीठीय कारभार विद्यार्थीकेंद्रीत व्हावा, यासाठी कुलगुरू पाटील यांनी मनस्वी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या शनिवारी कुलगुरू स्वत: समस्याग्रस्त विद्यार्थ्यांना भेटतात आणि समस्यांचे निराकरण करून घेतात. याद्वारा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ घेता आला. पी.एच.डी.संदर्भातील प्रक्रिया सुलभ करण्याचे कामही कुलगुरूंनी लिलया केले आहे. काही विद्यीपीठांमध्ये यासंदर्भात संबंधीत लोक आर्थिक गैरप्रकार करीत असल्याच्या घटना घडल्या होत्या. तसला प्रकार आपल्या विद्यापीठात होऊ नये म्हणून पीएच.डी.ची व्हायवा झाल्यानंतर लगेचच नोटीफिकेशन दिले जाते. एवढी तत्परता दाखविणारे बहुधा हे आपलेच विद्यापीठ असावे. विद्यापीठात जाणारा रस्ता आणि त्यातच बसेसचा तुटवडा यामुळे विद्यार्थी त्रस्त होते. ही समस्या लक्षात घेत कुलगुरूंनी ‘राजश्री शाहू महाराज टॅ्रव्हल पास फॅसिलीटी स्कीम’ सुरू केली व याद्वारा बसेस उपलब्ध करून विदयार्थ्यांच्या मासिक पासेसचा 50 टक्के खर्च विद्यापीठाने उचलला. विद्यापीठाचा डोंगराळ परिसर लक्षात घेता, विद्यार्थीनींना व दिव्यांग विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यासाठी कायनेटीक कंपनीची ‘ग्रीन व्हेईकल बस’ विद्यापीठाने विकत घेतली व विद्यार्थी सेवेत प्रदूषणरहीत बस सुरू झाली.

3) समाजासाठी उपक्रम (डेलळरश्रलश्रश र्ींरींर्ळींळींळली)- विद्यार्थी प्रगत व उन्नत होऊन ज्या समाजासाठी वावरणारा आहे. त्या समाजासाठी विद्यार्थी तयार व्हावेत म्हणून समाजासाठी उपक्रम राबविण्याचा कुलगुरूंनी संकल्प केला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला जेव्हा कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नामाभिदान प्राप्त झाले. त्यानंतर प्रथमच विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. जेष्ठ साहित्यिक व रंगकर्मी राहुल सोलापूरकर या संमेलनाला उपस्थित होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजासाठी लिहिलेल्या साहित्याची माहिती समाजाला झाली. युवारंग या कार्यक्रमाच्या धर्तीवर स्वतंत्र क्रीडा महोत्सव आयोजित करणारे आपले विद्यापीठ पहिले ठरले आहे. याशिवाय उहेळलश इरीशव उीशवळीं डूीींशा (उइउड) खाश्रिशाशपींरींळेप या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली आवड जोपासण्याची संधी मिळाली आहे. योगा-स्पोर्टस व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत. म्हणजे एखादा विद्यार्थी भौतीकशास्त्रात पदवी घेत असेल पण त्याला संगीत किंवा खेळ या विषयात रूची असेल, तर त्याला सोबत हा विषय सुध्दा घेता येईल. असा प्रयोग करणारे आपले विद्यापीठ देशातील बहुधा प्रथम असेल.

4) परीक्षा पध्दतीत सुधारणा (एुरा ठशषेीा)- एकदा मुलीच्या शाळेत पालक म्हणून भेट दिली तेव्हा कुलगुरू पाटील यांना ‘ओपन डे’ च्या माध्यमातून मुलीने स्वत: लिहीलेले व शिक्षकांनी तपासलेले परीक्षा पेपर बघायला मिळाले. ही पध्दत आपल्या विद्यापीठात सुरू करण्याचे धाडस त्यांनी केले. हा प्रयोग फक्त आपल्याच विद्यापीठात सुरू आहे.

याशिवाय दिव्यांगांसाठी, आज दि. 26, बुधवारपासूनच धुळ्याच्या विद्याविर्धनी कॉलेजमध्ये या दिव्यांग क्रीडा महोत्सवाला सुरुवात होत आहे. तसेच ‘रूसा’च्या माध्यमातून त्यांचे उदात्तीकरण करणे, श्यामची आई या साने गुरूजी लिखित पुस्तकाचे उर्दू भाषांतर, ‘बोलतो मराठी’ उत्सव संपन्न करणे, जलसंजीवनी बंधारा, दिव्यांग महोत्सव सुरू झालेत. नंदुरबारला 25 एकर जागेत विद्यापीठाची ट्रायबल अ‍ॅकॅडमी सुरू होतेय. यासाठी नुकतेच सरकारकडून 15 कोटी अनुदान मिळाले, असे अनुदान मिळण्याची विद्यापीठीय इतिहासातील ही पहिली घटना आहे. या ठिकाणी सिटीलाईक व्हिलेजेस (उखङङअॠए) ही संकल्पना साकारली जात आहे. या अवलियाविषयी भुसावळच्या माझ्या प्राध्यापक मित्राने सांगितल्यानंतर त्यांना भेटण्याची उत्सुकता होती अशा या अवलीया कुलगुरूस नुकताच भेटण्याचा योग आला आणि औचित्य नसतांनाही त्यांच्या या विद्यापीठीय कारभारावर शब्द प्रकाश टाकण्याचा मोह आवरता आला नाही. पण त्यांच्या एकंदरीत कार्यपध्दतीचे अवलोकन केले असता एका हिंदी काव्यातील ओळी आठवल्याशिवाय राहात नाही.

न मै भीड हू । न मै शोर हू
इसलीए मै कोई और हू

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!