Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedगोरा संत : जिम कॉर्बेट !

गोरा संत : जिम कॉर्बेट !

बंदुकीच्या एकाच गोळीने त्याने ‘चंपावत’ला खलास केले. तेव्हापासून तो कुमाऊ गढवाल प्रदेशचा राजा झाला. ‘गोरा साधू’ ही उपाधी त्याला चिकटली. साधू-संतांपेक्षा जास्त भक्तिभावाने व आदराने स्थानिकांच्या हृदयात स्थान मिळवणारा हा ‘गोरा संत’ म्हणजे ‘जिम कॉर्बेट’!

डॉ. संदीप श्रोत्री

- Advertisement -

1930-35 मधली गोष्ट. हिमालयाच्या पायथ्याचा जंगलाचा प्रदेश! एका बाजूला खळाळती, अवखळ गंगा नदी शांत आणि विस्तीर्ण होती तर दुसर्‍या बाजूला हिमालयाचीच सुरुवातीची परंतु हिमालय पर्वताच्या किती तरी लाख वर्षे पूर्वीपासूनच अस्तिवात असलेली शिवालिक पर्वतश्रेणी आणि त्यादरम्यानचा कुमाऊ-गढवालचा तराई जंगलांचा भूभाग; त्याकाळात तिथे जवळ जवळ बावीस हजार (!) पट्टेरी वाघ होते. बिबटे, क्वचित चित्ते, अस्वले यांची गणतीच नाही. मानवी लोकसंख्या मात्र अवघी तीस ते चाळीस हजार इतपतच मर्यादित होती. तो काळच असा होता की वाघाने एकट्या-दुकट्या माणसावर हल्ला करणे ही काही विशेष बातमी नव्हती! परंतु अशाच काळात या भागामध्ये मात्र काही ‘व्याघ्र महाराजांनी’ आपली दहशत बसवली होती.

एक वेळ अशी होती की एक तर इथे वाघ तरी राहतील किंवा मनुष्य तरी असेल! नेपाळच्या जंगल प्रदेशामध्ये एका वाघिणीने फारच धुमाकूळ घातला होता. आठवड्याला दोन या हिशेबाने तिने जवळ जवळ तीन वर्षे माणसे मारली होती. या ‘चंपावत’ वाघिणीला नेपाळच्या सीमा भागातल्या लोकांनी शेकडोच्या संख्येने एकत्र येऊन ढोल-ताशा बडवत भारताच्या कुमाऊ भागामध्ये हुसकावले होते. पण त्यामुळे तिला काय फरक पडत होता? तिने घेतलेल्या मनुष्यबळींची संख्या तोपर्यंत साडेचारशेपर्यंत गेली होती. अकरा फूट लांबीची ही ‘चंपावत’ राणी एकदा का एखाद्या खेडेगावाच्या आसपास आली की त्या पंचक्रोशीतल्या लोकांचे सर्व व्यवहार ठप्प होत, शेतीची कामे, तिखट, मीठ, मिरचीसाठी करावी लागणारी वणवण, आजारी माणसाला दूर शहरात घेऊन जाणे आदी सर्व एकदम बंद. गावाभोवती रोज सायंकाळी शेकोट्या पेटवल्या जात असत. दहा-बाराच्या संख्येनेच लोक दिवसा बाहेर पडत. परंतु हळूहळू या ‘चंपावत’बाईंची भीड इतकी चेपली की ती दिवसा उजेडीसुद्धा गावातल्या रस्त्यावरून धीटपणे गर्जना ठोकत, गुरकावत, धमकावत फिरू लागली. मनाला येईल त्यावेळी ती झोपड्यांमध्ये शिरून मुलांना उचलायची. अगदी बद्रीनाथ-केदारनाथ यात्रांंचे यात्रेकरूसुद्धा तिच्या तडाख्यातून सुटले नव्हते. या यात्रा ओस पडू लागल्या आणि मग तिथल्या लोकांनी एकत्र येऊन आणि सरकार दरबारच्या ब्रिटीश अधिकार्‍यांनी एका व्यक्तीला विनंतीवजा अर्ज केला. तो असा होता- ‘आम्ही सर्व या गावातले रहिवासी, तालुक्याचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी विनंती अर्ज करतो की, आपण लवकरात लवकर आमच्या भागामध्ये यावे. आपला अमूल्य वेळ खर्चून आम्हाला त्रास देणार्‍या या ‘चंपावत’ नावाच्या राक्षसिणीला यमसदनी पाठवावे. आपल्या या कार्याबद्दल आम्ही देवाकडे आपल्या भावी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू!’स्थानिक रहिवासी आणि ब्रिटीश अधिकारी यांची ही आर्जवे त्या देवदूतापर्यंत पोहोचली. तो त्याच्या सात-आठ स्थानिक मदतनिसांबरोबर त्या गावी मजल दरमजल करून आला. त्या दिवशीच नव्हे तर अगोदरच्या चार-पाच दिवसांपासून तिथे फक्त स्मशानशांतता होती. घराबाहेर कोणीही पडले नव्हते. रस्त्यावरून जात होती ती फक्त ‘चंपावत’ वाघीणीचीच पावले.

हा गावामध्ये तो पोहोचला आणि त्या गावकर्‍यांना थोडाफार आधार आला. त्याने गावकर्‍यांसाठी घराबाहेर झोपणे पसंत केले. ‘चंपावत’ वाघीण मात्र त्यालासुद्धा जुमानत नव्हती. तिने त्याच रात्री एका झोपडीतून एका मुलीला उचलून गावाशेजारील नाल्यापाशी नेले. हा नंतर धाडसाने माग काढत तिकडे गेला. आयुष्यात त्याने अनेक शिकारी केल्या होत्या, अनेक नरभक्षकांना ठार मारले होते. त्या ओढ्याकाठी अगदी करवतीने वा कुर्‍हाडीने कापल्यासारखा त्या मुलीचा पाय पडला होता, गरम रक्त त्यातून गळत होते. ओढ्यापलीकडे न जाता तो विषण्ण मनाने परत गावात आला. त्या मुलीच्या बहिणीची भीतीने वाचाच गेली होती. तो पुन्हा लगेच त्या ओढ्याकडे आला, मनामध्ये त्या मुलीचे विचार होते आणि अगदी अकस्मात साक्षात ‘चंपावत’ त्याच्यासमोर 10-15 फुटांवर उभी होती. जणूकाही ‘काळ’च समोर उभा होता! त्याच्या बंदुकीच्या एकाच गोळीने चंपावत खलास झाली आणि ओढ्याच्या उतारावर मातीत गडगडत तिने याच्या पायावर प्राण सोडले. त्या क्षणापासून तो अख्ख्या कुमाऊ गढवाल प्रदेशाचा राजा झाला. ‘गोरा साधू’ ही उपाधी त्याला चिकटली. बद्रीनाथ-केदारनाथ, मानसरोवर यात्रा करणार्‍या साधू-संतांपेक्षा जास्त भक्तीने, प्रेमाने आणि आदराने स्थानिक जनतेच्या हृदयात जाऊन बसणारा हा गोरा ‘संत’ म्हणजे ‘जिम कॉर्बेट’. जिम कॉर्बेट यांचे पूर्ण नाव जेम्स एडवर्ड कॉर्बेट. इंग्लंडच्या सुधारणावादी आणि तुलनेने मवाळ धोरणाच्या राजवटीच्या अंमलाखाली भारत दीडशे वर्षे पारतंत्र्यामध्ये असला तरी त्यांनी आपल्याला अनेक गोष्टी आणि अनेक व्यक्तींची देणगी दिली आहे. त्यामध्ये रेल्वे वाहतुकीपासून आधुनिक आरोग्यसेवा, मोठमोठ्या शिक्षण संस्थाही त्यांनीच सुरू केल्या आणि तशीच ‘जिम कॉर्बेट’ नावाची एक फार मोठी देणगीही त्यांनीच या
देशाला दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या