Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedकोरोना – नुकसानाची व्याप्ती !

कोरोना – नुकसानाची व्याप्ती !

जगभरात वेगाने पसरणाऱ्या धोकादायक कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे. त्यामुळे भारतासह जगातील आघाडीच्या पंधरा देशांना अब्जावधींचे नुकसान सहन करावे लागत आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार कोरोना संसर्गामुळे भविष्यात भारतातील उद्योगाला सुमारे ३४.८ कोटी डॉलरचा तोटा सहन करावा लागेल.

कोरोनामुळे जगात सर्वाधिक नुकसान चीनला सोसावे लागणार आहे. चीनची जागतिक निर्यात ५० अब्ज डॉलरपर्यंत कमी होऊ शकते. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव हा मशिनरी, मोटार वाहन आणि दळणवळण साधनांवर पडला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका युरोपिय संघ (१५.६ अब्ज डॉलर), संयुक्त राज्य अमेरिका (५.८ अब्ज डॉलर), जपान (५.२ अब्ज डॉलर),दक्षिण कोरिया (३.८ अब्ज डॉलर), चीनचा तैवान प्रांत ( २.६ अब्ज डॉलर) आणि व्हियतनाम (२.३ अब्ज डॉलर) या देशांना बसला आहे. ओईसीडीने देखील कोरोनाच्या वाढत्या लक्षणांमुळे जागतिक जीडीपी ५० बेसिस पॉइंट (२०१९ मध्ये २.९ टक्क्यांहून २.४ टक्के) होण्याचा अंदाज बांधला आहे. आशियायी डेव्हलपमेंट बँकेच्या मते, कोरोनाचा विकसनशील देशांवर अधिक परिणाम पडेल. सीआयआयच्या मते, भारत हा चीनमधून आघाडीच्या २० सामानापैकी ४३ टक्के आयात करते. त्यात ७.२ अब्ज डॉलरचे मोबाइल हँडसेंट आणि ३ अब्ज डॉलरच्या कॉम्प्यूटर आणि पार्टसचा समावेश आहे. परंतु या आयातीवर परिणाम झाला आहे. चीनची अर्थव्यवस्था कमालीची ढासळल्याने भारतावरही त्याचे व्यापक परिणाम होऊ शकतात.

- Advertisement -

या क्षेत्रातील नोकरी जाण्याची शक्यता : कोरोनामुळे आगामी काळात ज्या क्षेत्राला अधिक फटका बसणार आहे, त्यात हवाई क्षेत्राचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तसेच पर्यटन उद्योगाशी निगडीत कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा फटका बसणार आहे. यात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गमावण्याची येऊ शकते.

असंघटित क्षेत्र : दहा ते पंधरा कोटी कर्मचारी असंघटित क्षेत्रात काम करतात. कोरोनामुळे कामगर, विणकर, मोलमजुरी करणारे व्यक्ती यांना फटका बसू शकतो. असंघटित क्षेत्रातील ९० टक्के जणांची नोकरी जाण्याची शक्यता आहे.

विमान क्षेत्र : भारतात विमान क्षेत्रात ३.५ लाख कर्मचारी काम करतात. सध्याच्या काळात २०० हून अधिक उड्डाणे रद्द. मोठ्या प्रमाणात वेतन आणि नोकर कपातीची शक्यता.

रिटेल सेक्टर : ४.५ कोटीहून अधिक नागरिक रिटेल क्षेत्रात काम करतात. कोरोनामुळे मॉलपासून ते हायपर मार्केट बंद. या क्षेत्रात २५ टक्के म्हणजेच एक कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संक्रात येण्याची शक्यता.

टॅक्सी सेवा : ओला-उबरमध्ये ५० लाख लाखाहून अधिक चालक. २० लाख चालकांकडून खासगी सेवा. वाहतूक कमी झाल्याने ५० टक्के लोकांवर नोकरी गमावण्याची
वेळ.

तात्पुरते कर्मचारी : विविध कंपन्यांत १.३७ कोटी व्यक्ती तात्पुरत्या स्वरुपात नोकरीवर काम करतात. कोरोनामुळे ऑटोपासून कंझ्यूमर गूडसच्या मागणीत घट

पर्यटन आणि हॉटेल : पर्यटन उद्योगात ५.५ कोटीहून अधिक नागरिक या क्षेत्रात कार्यरत. १.२० लाख जणांना थेटपणे नोकरी गमावण्याची वेळ

इंफ्रा आणि रिअल इस्टेट : मंदीमुळे २० टक्के लोकांना अगोदरच घरी पाठवण्यात आले आहे. कोरोनामुळे यात आणखी ३५ टक्के भर पडण्याची शक्यता. अर्थव्यवस्थेतील सुधारणा होण्याची शक्यता लांबणीवर.

आर्थिक आणि उद्योग हालचालीत घट : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगातील बहुतांश देशांनी सीमा बंद केल्या आहेत. सरकारने घरगुती पातळीवर शाळा, कॉलेज, मॉल, पब, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट यासारखी सार्वजनिक ठिकाणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या