Type to search

हिट-चाट

आर्टीकल 15 चित्रपटाची पहिल्या दिवशीच बक्कळ कमाई

Share

मुंबई – वे उस किताब की नहीं चलने देते, जिसकी ये शपथ लेते हैं… असं म्हणत चित्रपट आर्टीकल 15 रूपेरी पडद्यावर दाखल झाला आहे. समिक्षकांनी त्याचप्रमाणे प्रेक्षकांनीदेखील चित्रपटाच्या कथेचे आणि भूमिकांचे कौतुक केले आहे. वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या चित्रपटाने पहिल्या दिवशी जवळपास पाच कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित चित्रपटात आयुषमानसोबतच ईशा तलवार, मनोज पहवा, सयानी गुप्ता, कुमूद मिश्रा आणि मोहम्मद जिशान या कलाकारांनी भूमिका साकारली आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा गौरव सोलंकी यांनी लिहली आहे. चित्रपटाची कथा 2014 मध्ये उत्तर प्रदेशच्या बदायू येथे झालेल्या सामूहिक बलात्कारावर आधारलेली आहे. या घटनेनंतर देशात एकच खळबळ उडाली होती. धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर होणारा भेदभाव आर्टिकल-15 या चित्रपटात खुबीनं रेखाटण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी केला. या चित्रपटात पहिल्यांदाच आयुषमान पोलिसाच्या भूमिकेत दिसतोय.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!