कला-क्रीडा शिक्षकांच्या तासिका पूर्ववत

0

शारीरिक शिक्षण बचाव व कृती समितीच्या प्रयत्नांना यश

अहमदनगर (प्रतिनिधी) – कला व क्रीडा शिक्षकांनी राज्यव्यापी आंदोलन उभे केल्याने शासनाला झुकावे लागले. दि. 23 ऑगस्ट रोजी कला-क्रीडा शिक्षक संघटनांसोबत झालेल्या बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी तासिका पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला होता.
याच्या यशस्वीतेसाठी क्रीडा महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, राज्य समन्वयक अप्पासाहेब शिंदे, सचिव शिवदत्त ढवळे, संजय पठाडे, डॉ. अरुण खोडस्कर, विनोद इंगोले, प्रल्हाद साळुंके, प्रल्हाद शिंदे, वेणुनाथ कडू, घनश्याम सानप, पुरुषोत्तम उपर्वट, लिंबकर जितेंद्र यांनी महत्वाची भूमिका बजावली.
आंदोलाकांनी पुणे येथे धरणे आंदोलन, बैठा सत्याग्रह केला. विशेष अधिवेशन काळात शिक्षणमंत्री, विरोधी पक्षनेते यांना भेटून निवेदने दिली. एकजुटीने आंदोलने केल्याने हा एकजुटीचा विजय असल्याचे क्रीडा महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर म्हणाले.
लढा यशस्वी करण्यासाठी योगदान देणार्‍या पदाधिकार्‍यांचे मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित, राज्य कीडा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील गागरे, सचिव शिरीष टेकाडे, राज्य संघटक महेंद्र हिंगे, नितीन घोलप, बाबा बोडखे, अशोक डोळसे, भानुदास तमनर, विजय जाधव, दत्तात्रय नारळे, सुनील जाधव, अनिल पटारे, राजेंद्र कोहकडे आदींसह क्रीडा शिक्षकांनी अभिनंदन केले.

वेळापत्रकात असा होणार बदल –
सोमवार ते गुरुवार पूर्वीप्रमाणे 8 तासिका राहतील. शुक्रवारी व शनिवारी प्रत्येक तासिकेचा वेळ 5 मिनिटांनी कमी केल्याने शुक्रवारी एक तासिका वाढून 9 तासिका होतील. शनिवारी कमी केलेल्या वेळेत एक तासिका वाढेल व आणखी एक तासिका वाढविण्यात आल्याने 5 ऐवजी 7 तासिका होतील. आठवड्याचा एकूण कार्यकाल 25 मिनिटांनी वाढणार आहे.आरोग्य व शारीरिक शिक्षणास 6 वी ते 8 वी 4 तासिका 5 वी, 9 वी व 10 वी साठी आठवड्याला 3 तासिका देण्यात आल्या आहेत. कलेसाठी 6 वी ते 8 वी 4 तासिका, 5 वी व 9 वी साठी 3 तासिका देण्यात आल्या आहेत. 9 वी,10 वी इंग्रजी विषयाला 1 व 5 वी ला गणित इंग्रजी विषयाला 1-1 तासिका आठवड्याला वाढवून देण्यात आली असून कला व शारीरिक शिक्षणाबरोबर इतर विषयांकडे लक्ष देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*