‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या ड्रग विरुद्ध लढ्यास बॉलीवूड, हॉलीवूडचा पाठींबा

0
बंगळूर | एका अंदाजानुसार सुमारे 74 टक्के भारतीयांच्या घरात कमीत कमी एक व्यक्ती अमली पदार्थांचे व्यसन करत असल्याचे समोर आले आहे.
यामुळे भारतात दररोज 10 लोक आत्महत्या करत आहेत तर अनेकांचा मृत्यू होत आहे. आपला परिवार, मुलाबाळांचे जीवन, व्यवसाय आणि संबंधावरही उध्वस्त होण्याची स्थिति आली आहे.
भारतात युवावर्गावर ड्रग्जचा प्रभाव पडला आहे. या समस्येवर खूप दिवसापासून चळवळीची आवश्यकता होती. यासाठी श्री श्री रवी शंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने पुढाकार घेत ड्रग्ज रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यानंतर या लढ्याची व्याप्ती वाढली.
आज अनेक हॉलीवूड आणि बॉलीवूड कलाकारांनी या लढ्यात सहभाग घेतला असून व्यसनमुक्तीसाठी ते सर्वजन सामील झाले आहेत.
येत्या 18 फेब्रुवारी २०१८ रोजी चंडीगड यूनिवर्सिटी आणि गुरु जंभेश्वर विज्ञान आणि प्रौद्योगिकी विश्वविद्यालय हिसार हरियाणा  येथे कार्यक्रम होत आहे. तर 19 फेब्रुवारी रोजी श्री श्री रविशंकर आणि अभिनेता संजय दत्त सामील होणार आहेत.
इतर बॉलिवूडचे कलाकार वरूण धवन, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोपडा, कपिल शर्मा आणि बादशाह यांनीही या चळवळीला पाठिंबा दिला आहे.
या कार्यक्रमासाठी सुमारे 60 हजार विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच देशातील हजारो कॉलेज पण याच्या थेट प्रसारणाद्वारे जोडले जातील. ड्रग चा कुप्रभावाच्या विरोधाला लाखो लोक प्रतिज्ञाबद्ध होणार असल्याचेही याप्रसंगी सांगण्यात आले आहे.
ड्रग्जच्या विरोधानंतर सेलिब्रिटी काय म्हणतात?
जेव्हा तुम्ही युवावर्गाला त्यांच्या तणावाला हाताळण्यासाठी आध्यात्मिक उपाय प्राणायाम, ध्यान आणि योग  याचा उपयोग करणे शिकवता तेव्हा त्याचा जीवनाचा दृष्टिकोन पूर्णतया बदलून जातो. या धोक्याला संपवण्यासाठी आम्ही ड्रग मुक्त इंडियाची चळवळ हाती घेतली आहे.
श्री श्री रविशंकर, आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक. 
मी प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी पुढे येऊन ड्रग मुक्त भारताची ही  सर्वात मोठी चळवळ यशस्वी करावी
– संजय दत्त, अभिनेता
एक चांगल्या कारणासाठी आवाज न उठवणे काहीच योग्य नाही ।मी या कामात आपली आवाज समावून खूप अभिमानाचा अनुभव करते आणि  ड्रग मुक्त भारताचा महत्त्वपूर्ण चळवळीत सामील होऊन खूप गर्व वाटतो कारण माझा  यावर पूर्ण  विश्वास आहे की ड्रग  घेणे योग्य नाही आणि प्रत्येक माणसाने याला समजले पाहिजे
– सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्री
या कठीण कार्यात प्रत्येक जण पुढे येत आहे म्हणून मला आनंद होत आहे।
– परिणीती चोपडा 
भारतात युवा वर्ग मोठ्या संख्येने आहे आणि आज आमच्या युवावर्गाचा सर्वात मोठा शत्रु  अमली पदार्थाचा वापर झाला आहे. मी या लढाईत सहभागी आहे.
वरुण धवन, अभिनेता
आम्हा सर्वांनी अमली पदार्थांचा प्रयोग करणार नाही आणि करूही देणार नाही यासाठी प्रतिज्ञाबद्ध झाले पाहिजे. मला विश्वास आहे की आम्ही या समस्येला नेहमीसाठी दूर करू.
– बादशाह 
ड्रग फक्त  तुमचेच नव्हे तर पूर्ण परिवाराचे सुख हिरावून घेते ।आमचा भारत ड्रग मुक्त भारत
– कपिल शर्मा 
डोण्ट बी ए फूलड्रग इज (नाट कूल ड्रग घेणे योग्य नाही यात गुरफटू नका)
– वरूण शर्मा

LEAVE A REPLY

*