अपंग, गरजूंना प्रदर्शनासाठी आवाहन

0
नाशिक । दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या गरीब, गरजू आणि डिफरन्टली ऐबल (विशेष व्यक्ती) सर्जनशील कलाकारांसाठी त्यांनी बनवलेल्या पणत्या, आकाशकंदिल आणि इतर हस्तकला वस्तूंची विक्री करण्याची संधी ‘आर्ट हब’तर्फे आयोजित प्रदर्शनात देण्यात येणार आहे.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला दि.14 आणि 15 ऑक्टोबरदरम्यान गंगापूररोडवरील प्रसाद मंगल कार्यालय येथे खास उत्सवानिमित्त हस्तवस्तू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पणत्या, आकाशकंदिल, मेणबत्या, हस्तकौशल्याच्या विविध वस्तू, कपडे, शुभेच्छापत्र, पर्स, तोरण यासह गृहसजावटीच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांचे प्रदर्शन भरवून विक्री केली जाणार आहे.

प्रदर्शनतील ‘सृजन साधना’ स्टॉलवर दुर्गम भागातील आदिवासी, विशेष व्यक्ती, दिव्यांग, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय महिला, व्यक्तींना सहभागी होण्यासाठी कुठलेही मूल्य आकारले जाणार नसल्याची माहिती ‘आर्ट हब’च्या अश्विनी देशपांडे यांनी दिली.

सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने आयोजित प्रदर्शनात कलाकारांनी आपल्या वस्तूंसह सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी अश्विनी देशपांडे, अर्चित एनक्लेव्ह, 1363, जिल्हाधिकारी बंगल्याच्या मागे, कोतवाल पार्क, बॉडीलाईन फिटनेसजवळ, नाशिक येथे किंवा 9767075734 या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

*