Video : नाशिकमधील या जगावेगळ्या अँटिक वस्तू आपल्याकडे असायलाच हव्यात

0
नाशिक, ता. ३ : जुन्या पद्धतीची धातूची छोटीशी स्कूटर… वास्को द गामा किंवा पायरेटस् ऑफ कॅरेबियन
चित्रपटातील शोभावी अशी जुन्या वळणाची दुर्बीण, ठेवणीतली कलात्मक घड्याळे.. विविध चित्रकार आणि कलाकारांच्या अस्सल चित्रे… अशा एक ना दोन वस्तू इथे पाहिल्या की कोणती घेऊ आणि कोणती नको असे होऊन जाते.

एरवी ज्या गोष्टींसाठी नाशिकबाहेर किंवा कदाचित परदेशातही जावे लागे, त्या आता थेट आपल्या शहरातच मध्यवर्ती ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत, एका वैशिष्ट्यपूर्ण कलादालनाच्या माध्यमातून.

 

आर्ट अँटिका असे या कलादालनाचे नाव असून नाशिकच्या गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहाच्या समोरील श्रद्धा संकुलमध्ये हा छोटासा कला स्टुडिओ आहे. विशेष म्हणजे व्यावसायिक किंवा उद्योजकाने नव्हे, तर एका अस्सल कलाकाराने हा स्टुडिओ थाटला आहे. अलका ठाकूर असे त्यांचे नाव.

सौ. ठाकूर यांचा पिंड मुळातच कलावंताचा. विविध क्रॉफ्ट, पेंटिंग्ज बनविण्याची त्यांना आवड. त्यांचे घरचे वातावरणही कलासक्त आणि कलाप्रेमी. त्यांनी स्वत: कलेतून साकारलेल्या वस्तूंशिवाय ‘अँटिक पिस’ जमविण्याचाही त्यांना छंद होता. त्यांच्याकडे येणाऱ्या मित्रमंडळी, नातेवाईकांकडूनही या वस्तूंबद्दल विचारणा होई. अनेकांनी तुम्ही हे आमच्या सारख्यांसाठी का नाही सुरू करत असा सल्लाही दिला.

संचालिका अलका ठाकूर म्हणतात की या सर्व पार्श्वभूमीवर मी परिवाराशी चर्चा केली. त्यातूनच नाशिकमधील पहिल्या अनोख्या कलादालनाची कल्पना पुढे आली. पती, मुलगा आणि स्नेहीजनांच्या भक्कम पाठिंब्यावर मी आज त्याला मूर्त रूप देऊ शकले. खरा कलावंताच्या कलेतून इतरांनाही आनंद मिळतो, तेव्हा ती गोष्ट त्याच्यासाठी समाधानाची असते, हे सांगायला त्या विसरल्या नाहीत.

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सुरू झालेल्या या कलादालनाला अस्सल कलाप्रेमी नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या गृहसजावटीच्या संकल्पना बदलल्या आहे. आधुनिक घरात जुन्या पद्धतीच्या ‘अँटिक’ वस्तू, किंवा पेंटिंग्ज, हस्तकलेच्या वस्तू याकडे अनेकांचा ओढा असतो.

पूर्वी अशा वस्तू नाशिकमध्ये मिळत नव्हत्या. मात्र आता सौ. ठाकूर यांनी नाशिकरांना ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी वेगळा आशय आणि विषय असलेले अस्सल पेटिंग्ज, हॅण्डीक्राफ्टस्, आर्टी क्राफ्टस् याशिवाय इतर कलात्मक आणि नजाकतीच्या वस्तू कलाप्रेमींना खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

*