Friday, April 26, 2024
HomeUncategorizedकंजरवाड्याजवळ अवैध दारू विक्री करणारा अटकेत  

कंजरवाड्याजवळ अवैध दारू विक्री करणारा अटकेत  

जळगाव –

कंजरवाडा परिसरात सर्रास अवैधरित्या दारू विक्री होत असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अशाच प्रकारे दारू विक्री करणार्‍या एका तरुणास अटक केली आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात संचारबंदीमुळे सुरू आहे. सर्व  परमीट रुम आणि बियर बार बंद असतानाही अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री होत आहे.

या पार्श्‍वभूमिवर, मंगळवारी  दिवसा कंजरवाडा परिसरात दारू विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती.

त्यांनी कंजरवाड्यात मंगळवारी दुपारी अडीत वाजता धाड टाकून मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त करुन एका तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या