शिर्डी : दरोड्याच्या तयारीतील चार दरोडेखोर जेरबंद

0

शिर्डी पोलिसांची कामगिरी : मिरची पुड, लोखंडी गज, काठ्या जप्त

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- साईभक्तांचे वाहन तसेच त्यांना अडवून दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना शिर्डी पोलिसांनी मुसक्या घालुन जेरबंद केले. पाच पैकी चौघांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यातील एक जन फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिर्डीतील वॉटरपार्क जवळील देशमुख हॉस्पिटल शेजारील रस्त्यावरून जाणार्‍या साईभक्तांच्या वाहनाला अडवून भक्तांवर दरोडा घालण्याच्या तयारीत असतांना एक टोळी दबा धरून बसल्याची माहिती गुप्त खबर्‍यांकडून पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार तातडीने विभागीय पोलीस उपधीक्षक डॉ. सागर पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक संदीप कहाळे, पो.कॉ. शेलार, पो.कॉ. ए.व्ही. अंधारे, पो.कॉ. जगदाळे, पो.कॉ. कुर्‍हे, पो.कॉ. लोढे यांच्या पथकाला घटनास्थळी पाच इसम साईभक्तांना मारहाण करून लुटण्याच्या तयारीत असतांना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून चौघांना जेरबंद केले असून एक जन फरार झाला असल्याचे सांगितले.
त्यांच्या जवळील दरोडा टाकण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी कत्ती, मिरची पूड, लाकडी दांडा, लोखंडी गज आदी शस्र जप्त केले असून दरोड्यातील आरोपी अनिल बबन शिरसाठ, आदेश दत्तात्रय नागरगोजे, मनोज हिरामण हिंगे, आकाश अशोक आरणे सर्व राहणार शिर्डी यांना अटक केली असून त्यांच्यावर शिर्डी पोलीसांत 156/17 नुसार भादवि कलम 399 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
आरोंपींना राहाता न्यायालयात हजर करणार असुन अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी मागणार असल्याचे पो.नि. इंगळे यांनी सांगीतले. यापैकी आदेश नागरगोजे याच्यावर औरंगाबाद ग्रामीण पोलीसांमध्ये जबरी चोर्‍यांचे गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पो.कॉ. लोढे करीत आहे. सदरची कारवाही पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपाधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली असल्याचे पो.नि. इंगळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*