एटीएम फोडणारी नगरची टोळी गजाआड : नागापूर, सुप्यातील गुन्ह्याची कबुली

0

अहमदनगर (प्रतिनिधी)-नगर आणि पुणे जिल्ह्यात बँकांचे एटीएम मशीन फोडून त्यामधील रोख रक्कम लुटणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांनी गजाआड केली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील 5 तर उत्तरप्रदेशातील चार गुन्हेगार आहेत. यातील सहाजणांना अटक करण्यात आली आहे.

नवनागापूर आणि सुप्यातील एटीएम फोडल्याची कबुली या टोळीने दिली आहे. या टोळीची कसून चौकशी करण्यात येत असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या टोळीने 23 ऑगस्ट रोजी शिक्रापूर पाबळ रोडवर भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन व त्यामधील रोख रक्कम रुपये 15लाख 62हजारची रक्कम या दरोडेखोरांनी स्कॉर्पिओ जीप मधून चोरून नेली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. या टोळीला गजाआड केले.

या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एकूण 2 वाहने स्कार्पिओ व मारूती रिटज कार तसेच आरोपीच्या अंगझडतीत व त्यांच्याकडील वाहनात रोख रक्कम 3 लाख 93 हजार जप्त करण्यात आले. तसेच त्यांनी तोडून मोडून टाकून दिलेले Aएटीएम मशीन कर्जत येथे मिळून आले.

या टोळीत जब्बार लालासाहेब शेख वय 30 मूळ रा.आघी ता.जामखेड जि.अहमदनगर सद्या रा.रायकर मळा सद्गुरू बिल्डिंग फ्लॅट नंबर 18 धायरी पुणे. योगेश भानुदास कामठे वय 30 मूळ रा.आघी ता.जामखेड जि.अहमदनगर सद्या रा.संतोषनगर गणेश पार्क कात्रज पुणे.हनुमंत विष्णु वारे वय 23 मुळ रा. आघी ता.जामखेड जि. अहमदनगर सध्या रा.धायरी रायकर मळा पुणे.सुहास दत्तात्रय निंबाळकर वय 24 मुळ रा.दिघी ता.कर्जत जि. अहमदनगर सध्या रा.कात्रज संतोषनगर गणेश पार्क पुणे.सुशिल विष्णु वारे वय 24 मुळ रा.आघी ता.जामखेड जि. अहमदनगर सध्या रा.रायकर मळा वडगाव धायरी पुणे.जगदीशसिंग उर्फ बबलू प्रेमसिंग यादव वय 25 मुळ रा.लोंधा पुष्परास ता.शिरापूर जि.पौशांबी उत्तर प्रदेश सध्या रा.वडगाव बुद्रुक, दांगटनगर, ता.हवेली जि.पुणे. यांना अटक केली आहे.

शिक्रापूर, लोणीकाळभोर,भिगवण, नागापूर आणि सुपा येथील एटीम फोडल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यातील रकमेचा आणि अन्य गुन्हेगारांचा शोध पोलिस घेत आहेत.

LEAVE A REPLY

*