भरवस फाट्याजवळ अपघातात सुटीवर आलेला सेनादलाचा जवान ठार

0

लासलगाव (वार्ताहर) ता.21 – भरवस फाटा कोळपेवाडी रोड वरील मानोरी फाटाजवळ अपघातात गौरव भैरवलाल करपे (वय २४) यांचे आज अपघाती निधन झाले.

गौरव करपे हे भारतीय सेनादलात मध्ये देहरादून येथे नोकरीस होते. ३० दिवसांची सुट्टी घेऊन गौरव हे आपल्या गावी विंचुर येथे आलेले होते.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ट्रॅक्टर आणि पल्सर मोटर सायकल मध्ये मानोरी फाटा जवळ अपघात झाला या झालेल्या अपघातात गौरवचा जागीच मृत्यु झाला.

या अपघाताची लासलगांव  पोलिस ठाण्यांमध्ये अपघाताची नोंद झाली असून सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे  यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

*