लष्कराच्या जमिनीचा विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

0

शिष्टमंडळ जाणार मुंबईला; जमीन देण्यास तीव्र विरोध

अहमदनगर (प्रतिनिधी) – लष्कारला नगर, पारनेर आणि राहुरी तालुक्यातील सरकारी जमीन देण्यास या तीन तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेण्यात येणार असून शिष्टमंडळव्दारे लष्काराला जमीन देण्यास विरोध करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री यांची वेळ घेण्याची जबाबदारी पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी आ. शिवाजी कर्डिले, आ. विजय औटी, माजी खासदार दादापाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांची भेट घेवून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. तसेच या जमीन हस्तांरणाला विरोध करण्यासाठी कोणाला भेटायचे यांचे नियोजन करण्यात आले. त्यानूसार लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
निवासी उपजिल्हाधिकारी कदम यांच्या सोबत चर्चा करतांना यापूर्वी लष्काराल किती जमीन देण्यात आलेली आहे. लष्काराला जमीन दिल्यास मोठ्या प्रमाणात शेतकरी विस्तापित होवू शकतात. मुळा धरणालाही धोका होवू शकतो आदी प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. त्यावर कदम यांनी हा विषय वरिष्ठ पातळीवर असून वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानूसार माहिती घेवून त्यांना कळवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला जाणार्‍या शिष्टमंडळात पालकमंत्री राम शिंदे, खा. दिलीप गांधी, आ. विजय औटी, आ. शिवाजी कर्डिले, दादा पाटील शेळके आणि या तालुक्यातील शेतकर्‍यांचा समावेश राहणार आहे.

LEAVE A REPLY

*