Type to search

Featured नाशिक

अर्जुन सोनवणे फील्ड आर्चरी स्पर्धेत देशात अव्वल

Share

खेडगाव | वार्ताहर

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे 65वी राष्ट्रीय शालेय क्रीडा फिल्ड आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात खेडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील कु. अर्जुन शशिकांत सोनवणे याने उत्कृष्ट खेळ करुन रिकर्व्ह राउंड मध्ये तीन सुवर्ण पदके मिळवून भारतात प्रथम क्रमांक पटकावला. अर्जुनचा यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने मविप्र संचालक दत्तात्रेय पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अर्जुनला आर्चरीचे प्रशिक्षक प्रतिक थेटे, क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड, विकास गायकवाड, सुनिल शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यंक्ष तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, सरचिटणीस निलीमाताई पवार, संचालक दत्तात्रेय पाटील, जि. प. सदस्य भास्कर भगरे, विस्तार अधिकारी गवळी, केंद्र प्रमुख राजेंद्र गांगुर्डे, शिक्षणाधिकारी एस के शिंदे, नाशिक जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन सचिव मंगला शिंदे.

फिल्ड आर्चरी असोसिएशन सचिव कापडे, मुख्याध्यापिका के पी गांगुर्डे, उपमुख्याध्यापक आर डी गायकवाड, पर्यवेक्षक एस के संधान, शालेय समिती अध्यक्ष अनिलदादा ठुबे, राजेंद्र ढोकरे, दत्तात्रेय सखाराम पाटील, शशिकांत सोनवणे एस बी मोरे, डी जी पानसरे, बाळासाहेब पाटील, विनीत पवार, गोविंद बैरागी; राजेंद्र सूर्यवंशी, एस एस कळमकर, जी ए जाधव, विठ्ठलराव लोखंडे. आदीसह शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!