Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

अर्जुन-मलाईका एप्रिल 2019 मध्ये महिन्यात लग्न करणार ?

Share

 नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे जोरदार वारे वाहत आहेत. दीपिका-रणवीर , प्रियांका-निक लगीनघाईत असतानाच आता लवकरच अजून एक बॉलिवूड कपल बोहल्यावर चढणार असल्याचे समोर आले आहे. अर्जुन कपूर व मलाईका अरोरा हे ते कपल आहे.

अर्जुन-मलाईका 2019 मध्ये एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडध्ये सुरू आहे. मलाईकाने तिचा वाढदिवसही अर्जुनबरोबर इटलीत साजरा केला होता. 2017 साली मलाईका व अरबाज यांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून मलाईका अर्जुनबरोबरच जास्तीत जास्त वेळ घालवत असल्याचे अनेकवेळा समोर आले. पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल उघड चर्चा केली नाही. मात्र हे दोघं जोडपं बऱ्याच कार्यक्रमात एकत्र दिसत असल्याने त्यांचे प्रेम जगजाहीर झालं आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!