Friday, May 3, 2024
Homeनगरविकासात अधिकार्‍यांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही - उपसभापती अर्जुन काळे

विकासात अधिकार्‍यांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही – उपसभापती अर्जुन काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

पंचायत समितीच्या होणार्‍या बैठकीत विकासकामांचे नियोजन केले जात आहे. मात्र शुक्रवारी पार पडलेल्या सर्व साधारण सभेसाठी

- Advertisement -

काही विभागाचे विभाग प्रमुख गैरहजर असल्याचे निदर्शनास येताच उपसभापती अर्जुनराव काळे यांनी कडक भूमिका घेतांना यापुढे मासिक सभेला काही विभाग प्रमुख व अधिकार्‍यांनी गैरहजर राहून केलेली मुजोरी खपवून घेतली जाणर नाही अशी तंबी या बैठकीसाठी गैरहजर राहणार्‍या शासकीय विभागाच्या विभाग प्रमुखांना व अधिकार्‍यांना दिली आहे.

पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी सभापती पोर्णिमा जगधने यांच्या अध्य्यक्षतेखाली पार पडली. या सर्वसाधारण सभेला काही विभागाच्या विभाग प्रमुखांनी दांडी मारली. या मासिक सभेला तालुक्यातील राज्य शासनाच्या अखत्यारीत येणार्‍या महाराष्ट्र राज्य वीजमंडळ, एस.टी.महामंडळ, लागवड अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, तालुका लघूचिकित्सालय, कृषीविभाग, महाराष्ट्र जीवनप्राधिकरण, कुक्कुट प्रकल्प, ड्रेनेज विभाग, ग्रामीण रुग्णालय आदी शासकीय यंत्रणांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या सर्वसाधारण सभेला तहसील, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, ड्रेनेज आदी विभागाचे जबाबदार विभाग प्रमुख व संबंधित अधिकरी गैरहजर होते.

सभेला सर्व शासकीय यंत्रणांच्या जबाबदार अधिकार्‍यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असले तरी काही अधिकार्‍यांनी जाणून बुजून या सभेकडे पाठ फिरवली. गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवितांना घरकुल योजना, पशुसंवर्धन योजनेंतर्गत येणारे गायगोठे, आरोग्य विभाग, प्रधानमंत्री, रमाई, शबरी आवास योजना आदी शासकीय योजना अत्यंत प्रभावीपणे राबविल्या आहे.

मात्र त्यांना इतर शासकीय यंत्रणांकडून सहकार्य मिळत नसल्याचे चित्र या मासिक सभेत दिसून आले आहे. यावेळी गटविकास अधिकारी सचीन सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, अनिल कदम, श्रावण आसने, सौ.वर्षा दाणे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, तालुका आरोग्य अधिकारी सौ.वैशाली बडदे, उपअभियंता उत्तमराव पवार, पशुसंवर्धनचे डॉ.दिलीप दहे, महिला बालकल्याणचे पंडित वाघिरे, वनविभाग पूजा रक्ताटे, शिक्षणाधिकारी पोपट काळे, सर्व विभागाचे विस्तार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या