Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर: नगर अर्बनचा वाद खंडपीठात

Share

राजेंद्र गांधींची याचिका : 13 तारखेला सुनावणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – 109 वर्षाची परंपरा असलेल्या नगर अर्बन बँक निवडणुकीला दोन महिन्यांचा अवधी असला, तरी आतापासूनच खासदार दिलीप गांधी यांची कोंडी करण्यास सुरुवात झाली आहे. बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी बँकेविरोधात खंडपीठात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 13 तारखेला सुनावणी होणार आहे.

‘एक कुटुंब.. एक बँक..’ असे ब्रीद वाक्य असलेल्या नगर अर्बन बँकेला मल्टिस्टेटचा दर्जा मिळाला आहे. 18 संचालकांसाठी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँकेची निवडणूक लागेल असे सांगितले जाते. बँकेचे एक लाख 11 हजार सभासद असले तरीही त्यातील केवळ 60 हजार सभासदच मतदानास पात्र ठरणार आहेत. हजार रुपयांचा शेअर्स असणार्‍या सभासदालाच मतदान करता येणार आहे.

दोन वर्षे जुन्या सभासदालाच मतदान करण्याचा इतर बँकांचा नियम आहे. अर्बन बँकेने मात्र 60 दिवस अगोदरच्या सभासदालाही मतदानास पात्र असल्याचा नियम काढला आहे. त्यासाठी हजार रुपयांचा शेअर्स ही अट कायम आहे. बँकेकडून सुरत येथे शाखा असल्याचे वारंवार भाषणातून सांगितले जाते. मात्र तेथे शाखाच नाही. शिवाय एक संचालक सुरत येथील असल्याने त्याच्या निवडीलाही याचिकेत राजेंद्र गांधी यांनी आव्हान दिले आहे. राजेंद्र गांधी यांच्यावतीने अ‍ॅड. घोलप हे काम पाहत आहेत.

गांधींच्या मदतीला चोपडा
गत निवडणुकीत भाजपचे माजी शहरजिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर आणि अशोक कोठारी यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या पॅनलने माजी खासदार दिलीप गांधी यांच्या पॅनलला लढत दिली होती. विरोधकांचा एकही संचालक विजयी झाला नाही, मात्र यंदाच्या निवडणुकीतही विरोधकांची जमवाजमव करून पॅनलची तयारी सुरू असल्याचे समजते. राजेंद्र गांधी हे माजी संचालक याचिकाकर्ते असून त्यांच्या जोडीला सभासद असलेले राजेंद्र चोपडाही धावून आले आहेत.

मल्टिस्टेट कशी काय?
बँकेला सहा वर्षांपूर्वीच मल्टिस्टेटचा दर्जा मिळाला पण बँकेची एकही शाखा राज्याबाहेर नाही. मग बँक मल्टिस्टेट कशी काय? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. राज्याबाहेर बँकेची शाखा नसतानाही बँकेकडून गुजरात राज्य कार्यक्षेत्र दाखवून सुरतला शाखा असल्याचा केेलेला दावाही खोटा असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळंच मल्टिस्टेट दर्जा कसा काय? असे विरोधकांचे म्हणणे आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!