Type to search

आवर्जून वाचाच हिट-चाट

आमचे नाते टिकवण्यासाठी मी २१ वर्षे प्रयत्‍न केला : अरबाज

Share

मुंबई : अरबाज खान आणि मलायका अरोरा हे एकेकाळचे सर्वाधिक रोमॅन्टिक कपल होते. पण लग्नानंतर १७ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर दोघांनीही अचानक वेगळे होण्याचा निर्णय घेतला. केवळ वेगळेच नाही तर एकमेकांपासून घटस्फोटही घेतला. या घटस्फोटानंतर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. अर्थात मलायका व अरबाज यापैकी कुणीही या विषयावर कधीही बोलले नाही. मात्र अलीकडे एका मुलाखतीत अरबाज त्याच्या व मलायकाच्या नात्यावर बोलला. ‘मी तब्बल २१ वर्षे हे नाते टिकवण्यासाठी प्रयत्न केलेत. पण ते टिकू शकले नाही’, अशी भावना अरबाजने व्यक्त केली.

१९९८ मध्‍ये अरबाज आणि मलायका लग्‍नबंधनात अडकले होते. २०१६ मध्‍ये दोघे वेगळे होणार असल्‍याच्‍या चर्चा सुरू झाल्‍या होत्‍या. दरम्‍यान, मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचं अफेअर असल्‍याचे वृत्त येत होते. मीडिया रिपोर्ट्‍सनुसार, मलायका आणि अर्जुन आपलं नातं सर्वांसमोर आणू शकतात. दोघे यावर्षी लग्‍नदेखील करू शकतात. मलायकाशी घटस्‍फोट झाल्‍यानंतर अरबाज आणि त्‍याची मैत्रीण जॉर्जिया एंड्रियानी यांचं अफेअर असल्‍याची चर्चा होती. दोघेही अनेकदा एकत्र स्‍पॉट झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या रिलेशनशीपची चर्चा रंगली होती. परंतु, नुकताच अरबाजने एका कार्यक्रमात आपल्‍या आणि जॉर्जियाच्‍या नात्‍याबद्‍दल खुलासा केला आहे. योग्‍य वेळी, मी स्‍वत: सर्व काही खरं सांगेन, असे अरबाजने म्‍हटले होते.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!