Type to search

maharashtra जळगाव

जिल्हयाच्या विकासासाठी ४७६ कोटींच्या प्रारूप आराखडयास मंजूरी

Share

जळगाव – 

महाआघाडीचे सरकार अस्तीत्वात आल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी घेण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन 2020-2021 साठी 476 कोटींच्या प्रारूप आराखडयास मंजूरी देण्यात आली.

सोमवारी झालेल्या नियोजन समितीच्या आढावा बैठकीला जिल्हयातील सर्व आमदार उपस्थित होते. दरम्यान बैठकीला हजेरी लावलेले माजी पालकमंत्री गिरीश महाजन हे बैठकस्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यासपीठावर येण्याची विनंती करून आपल्या शेजारी बसवून घेतले.

या बैठकीत सर्वाधिक चर्चीला गेला तो महावीतरणच्या विविध ठिकाणच्या भोंगळ कारभारावरील विषय .जवळपाससर्वच सदस्यांनी महावितरणच्या भोंगळ काराभाराविषयी नाराजी व्यक्त केली.

जमीनीत मुबलक पाणी असतांना देखील वेळेवर वीज पुरवठा होत नसल्यामुळे शेतीला पाणी देताना शेतकर्यांची दमछाक होत आहे. अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान महावीतरणवीषयी येणार्या तक्रारी लक्षात घेवून पालकमंत्र्यांनी यावेळी महावीतरणच्या अधिकार्यांना तंबी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!