Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

भाजपला महाविकास आघाडीचा धक्का; महामंडळावरील अशासकीय समित्या बरखास्त करण्याचा निर्णय

Share

मुंबई | प्रतिनिधी 

राज्य सरकारने  विविध महामंडळावरील नियुक्त केलेल्या अशासकीय सदस्यांच्या   समित्या बरखास्त करण्याचा निर्णय  घेतला.याबाबत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी मंत्री   सन २०१४साली सरकार अस्तित्वात आल्यानंतर आता पर्यत ३०ते ३५ शासकीय महामंडळ/ आयोगावर अध्यक्ष आणि अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या राज्य  सरकारने केल्या होत्या. राज्यात अंदाजे ८८ विविध महामंडळ आणि आयोग आहेत.यावर बहुतेक नियुक्त्या ह्या राजकीय असतात.

दि.२८ नोव्हेबर रोजी राज्यात उद्धव ठाकरे यांच्या  नेतृत्वाखाली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे महाआघाडीचे सरकार आले आहे.त्यामुळे आपल्या कार्यकर्त्याची राजकीय सोय लावण्यासाठी  मागील सर्व महामंडळ बरखास्त करणे गरजेचे आहे.

हे लक्षात घेवून आज मंत्रिमंडळाच्या  बैठकीत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे मंत्री जयंत पाटील यांनी सरकारने मागील महामंडळवरील नेमलेल्या अशासकीय अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या तातडीने रद्द कराव्यात अशी मागणी केली. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदर सूचना मान्य करुन पुढील कार्यवाहीचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!