ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपंचायत निकष लागू करा

मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंद

0
सुरगाणा | ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे नगरपंचायत सेवेत समाविष्ट करण्याची मागणी सुरगाणा येथील कर्मचारी यांनी केली आहे.

येथील कर्मचारी अनेक वर्षापासून ग्रामपंचायत सेवेत कार्यरत आहेत. येथील ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत समावेश झाला. परंतु नगरपंचायतिचे नियम, नवे निकष दाखवून नगरपंचायत सेवेत या कर्मचाऱ्यांना सामावून घेणेबाबत अनुत्सकता दाखवित असल्याने या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात आहे.

त्यामुळे अन्याय निवारण कृती समिती ( महाराष्ट्र ) संघटनेच्या माध्यमातून न्याय मागितले जात असून याबाबत निवेदन नगराध्यक्षा रंजनाताई लहरे यांना देण्यात आले.

निवेदनावर प्रशांत पोतदार, जगदीश पीठे, मनोज पवार, चद्रकांत जाधव, भिका पीठे, सोमनाथ बागुल, विजय गोयल, आशा गोयल, दिपक डांबरे, छाया डांबरे, दुर्गा सोळंकि, गोविंद जाधव, अजित शेख, सुनिल पवार, किशोर चव्हाण, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मागण्या मान्य न झाल्यास ९ ऑगस्ट रोजी १ दिवसाचे सामुहिक रजा आंदोलन करण्यात येणार असून तरीही मागण्या मान्य न झाल्यास  २१ ऑगस्ट पासून येथील कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*