#Apple : Apple ने लॉन्च केला नवा iPad, HomePod आणि iOS 11

0
कॅलिफोर्नियामधील सेन जोस सिटीमध्ये Apple चा ‘वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 2017’ला सोमवारपासून सुरूवात झाली आहे.

9 जूनपर्यंत चालणार्‍या या इव्हेंटच्या पहिल्या दिवशी अॅपलचे सीईओ टिम कुक उपस्थित होते. मागील 15 वर्षांपासून अॅपल वर्ल्ड वाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्सचे आयोजन करत आहे. यंदा 6 मोठ्या घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती टिम कुक यांनी दिली.

अॅपलने पहिल्या दिवशी iOS 11 ऑपरेटिंग सिस्टिम, iPad PRO , नवा HomePod म्युझिक प्लेयर, iMAC डेस्कटॉप आणि MacBook लॅपटॉपशिवाय नव्या डिझाइनमध्ये अॅपल वॉच, अॅपल स्टोअर आणि अॅपल पे प्लॅटफाॅर्म लॉन्च केले.

#iPad Pro – अॅपलने सगळ्यात अॅडव्हान्स ipad च्या नव्या व्हर्जनसाठी Pro लॉन्च केला आहे. 64, 256 आणि 512 GB मेमरीवाला हा ipad आतापर्यंतचा सर्वात अॅडव्हान्स आहे. याची किंमत 649 डॉलर पासून 1099 डॉलर पर्यंत आहे. iPad Pro ची 10.5 इंच आणि 12.9 इंच साइजमध्ये आजपासून प्री-बुकिंग सुरू करण्यात आली आहे. याची डिलिव्हरी पुढील आठवड्यात सुरू होईल. 10.5 इंचवाल्या 64 GB व्हर्जनची किंमत 42 हजार रुपये आणि 2.9 इंच 64 GB व्हर्जनची किंमत 52 हजार रुपये आहे. 10.5 इंच डिस्प्लेवाल्या नव्या iPad Pro मध्ये A10X चिप, 6-कोर CPU आहे. तो मागील व्हर्जनपेक्षा 30 टक्के अधिक वेगवान आहे. याचे वजन अवघे 450 ग्रॅम आहे. बॅटरी लाईफ 10 तासांची आहे. यात तोच कॅमेरा आहे जो iPhone7 मध्ये आहे. यामध्ये यूजर 4K कॅटेगरीचे व्हिडिओ शुट आणि एडिट करु शकतात. हा iPad USB 3.0 ला सपोर्ट करतो यामध्ये फास्ट चार्जिग सुविधा देण्यात आली आहे.

#HomePod :- अॅपलने पुन्हा एकदा म्यूझिक पॉवरला HomePod च्या रुपात लॉन्च केले आहे. iPod ने HomePod च्या प्रवासात हा नवा टप्पा म्हणता येऊ शकेल. हा 7 इंचाचा होम म्यूझिक प्लेयर आहे. यात 4 इंचाचा वूफर देण्यात आला आहे. यात अॅपलच्या सर्वात वेगवान समजल्या जाणाऱ्या A8 चिपचा सपोर्ट आहे. हा 3D मेश फैब्रिकने कवर्ड आहे.

# iOS 11 :- अॅपलने नव्या ऑपरेटिंग सिस्टिम iOS 11 ची ऑफिशियल घोषणा केली आहे. यात अॅप ड्रॉवर नावाचे नवे फंक्शन देण्यात आले आहे. यामुळे युजर कोणत्याही अॅपला क्विक एक्सेस करु शकतात. याला iCloud सोबत इंटीग्रेट करण्यात आले आहे. यासोबतच सीरी प्लेटफॉर्ममध्ये विज्युअल इंटरफेस जोडण्यात आला आहे. यात भाषांतराचा नवा पर्यायही आहे. कुक यांनी सांगितले की 96% ग्राहक iOS पासून संतुष्ट आहेत.

#iMac आणि MacBook : – नव्या आणि अधिक चांगल्या डिस्प्ले सोबत iMacs ला आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. iMac चे Pro व्हर्जन सर्वात अॅडव्हान्स 18-कोर जीनॉन प्रोसेस सोबत आहे. हार्डकोर ग्राफिक प्रोफशनल्सला लक्षात घेवून हे करण्यात आले आहे.

याची किंमत सव्वा तीन लाखापेक्षा अधिक असेल ते डिसेंबर महिन्यापासून उपलब्ध असेल.

#MacBook :- मध्येही खुप सारे बदल करण्यात आले आहेत. यात सर्वात मोठा बदल हा इंटेलच्या लेटेस्ट ‘Kaby Lake’ प्रोसेसरला सपोर्ट करण्याबाबतचा आहे. याची बुकिंग आणि शिपिंग सुरु झाली आहे. फिनिश सोबत हा अॅपल iMac सीरीजचा सगळ्यात पॉवरफुल लॅपटॉप आहे.

#App Store :- नव्या अॅप स्टोअरची झलक दाखवताना टीम अॅपलने सांगितले की, Apps टॅब सारे अॅप्स दाखवेल. Today हे नाव वापरकर्त्याचे स्वागत करेल. याशिवाय Games टॅबही देण्यात आले आहे. यामुळे आपल्या आवडीचे गेम्स सर्च करणे सहज आणि सोपे होईल.

#Apple वॉच :- नव्या ऑपरेटिंग सिस्टम सोबत सीरीला जास्त प्रोएक्टिव करण्यात आले आहे. याचा अॅपल वॉचमध्ये वापर करत नव्या डिझाईन सोबत वर्चुअल असिस्टेंट देण्यात आला आहे. अॅपल वॉच आणि बाकी वियरेबल डिवाइसेससाठी नव्या ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा करण्यात आली आहे. याला वॉच OS-4 म्हणण्यात येईल. अॅपलची नवी डिझाईनर वॉच डिस्ने कॅरेक्टर मिकी आणि मिनी सोबतही मिळेल.

संपुर्ण समारंभात कुक 6 वेळा स्टेजवर आले आणि गेले. अॅपलच्या सहा नव्या प्रॉडक्टच्या सर्विस आणि ताकद बद्दल त्यांनी माहिती दिली. एंड्राइड टेक्नोलॉजीवर विनोद करत आम्ही त्यापेक्षा कितीतरी अधिक वेगवान असल्याचे त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

*