#iPhone : चार्जिंग करताना iPhone 8 Plus फुटला; अॅपलकडून चौकशी सुरू

0

iPhone 8 आणि iPhone 8 Plus भारतीय बाजारात उपलब्ध झाला आहे पण यंदा भारतात अजूनही ग्राहकांनी हवा तसा प्रतिसाद दिलेला नाही.

3 ऑक्टोबरला भारतात  iPhone x ची विक्री सुरू होईल त्यामुळे iPhone 8 ला प्रतिसाद कमी असल्याचं बोललं जात आहे.

iPhone 8 Plus फुटण्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. एक घटना तायवानमध्ये तर दुसरी घटना जपानमध्ये घडलीये. डॅमेज झालेल्या फोनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

एका कस्टमरने iPhone 8 Plus चा पाच दिवस वापर केला. पण त्यानंतर चार्जिंग दरम्यान  iPhone 8 Plus चे पार्ट्स वेगळे झाले. बॅटरी फुगल्यामुळे हा प्रकार झाल्याचा दावा कस्टमरने केला आहे. तायवानमध्ये ही घटना घडली आहे. अॅपलने या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत. या कथित घटनेनंतर अॅपलने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. MacRumors ला अॅपलच्या प्रवक्त्याने आम्हाला या प्रकरणाची माहिती असून  या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत असं सांगितलं.  

LEAVE A REPLY

*