‘अपोलो’चे हार्ट फेल्युअर क्लिनिक रुग्णसेवेत

0

नाशिक । जागतिक हृदयदिनाचे औचित्य साधून अपोलो रुग्णालयात हार्ट फेल्युअर क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला. दर महिन्याच्या दुसर्‍या आणि चौथ्या शनिवारी हृदयरोगींसाठी विशेष ओपीडी सुविधाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती हृदयरोगतज्ञ डॉ. सुधीर शेतकर यांनी दिली.

हृदयविकार असलेल्या रुग्णांचा शेवट हार्ट फेल्युअर म्हणजे हृदयाचे पंपिंग कमी झाल्यामुळेच होतो. अशा रुग्णांसाठी विशेष उपचार आणि काळजीची गरज असते. त्यासाठी ‘अपोलो’ने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि अद्ययावत दर्जाची यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.

‘सडन कार्डियाक अरेस्ट’ या प्रकारात रुग्णांच्या हृदयाचे ठोेेके अनियमित होतात आणि त्यामुळे त्याचा मृत्यू संभावतो. हे टाळण्यासाठी विशिष्ट पेसमेकर आणि व्यापक आणि सर्वंकष उपचार, मार्गदर्शन आणि निगराणीची गरज येथे पूर्ण होणार आहे. डॉ. शेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हार्ट फेल्युअर’ क्लिनिकची संकल्पना साकारण्यात आली आहे.

हृदयाचा झटका, झडपांचे आजार, हृदय संसर्ग, अनियंत्रित रक्तदाब यामुळे हार्ट फेल्युअर होऊन ‘सडन कार्डियाक अरेस्ट’मुळे रुग्ण दगावू शकतो.

अशा रुग्णांसाठी वरदान असलेले ऑटोमॅटिक इन्पॅन्टेबल कार्डिव्हर्ट डेफ्रिब्रिलेटर (एआयसीडी) हे उपकरण येेथे उपलब्ध आहे. याशिवाय अत्याधुनिक कॅथलॅब, 128 स्लाईस सी. सी. स्कॅन, एम.आर.आय. अशी सुविधा येथे उपलब्ध आहे, अशी माहिती देण्यात आली. यावेळी ‘अपोलो’चे हृदय शल्यचिकित्सक डॉ. अभयसिंग वालिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनुज तिवारी यांची उपस्थिती होती.

अटॅक अन् सडन कार्डियाक अरेस्ट : हृदयविकाराचा झटका येणे आणि सडन कार्डियाक अरेस्ट (एसटीडी) हे दोन्ही भिन्न आहे. एसटीडी हा विकार तरुणांमध्येही होऊ शकतो, असे सांगून डॉ. शेतकर यांनी हृदयविकाराचा झटका आल्यास हृदयाला तात्पुरता रक्तपुरवठा बंद होऊन झटका येतो तर ‘एसटीडी’मध्ये हृदयाचे ठोके अनियमित पडत असतात. त्यामुळे हार्ट फेल्युअर होऊन सडन कार्डियाक अरेस्ट होतो, अशी माहिती देऊन अशा रुग्णांना ‘एआयसीडी’ या उपकराच्या माध्यमातून सौम्य शॉक दिले जातात, असे सांगितले.

LEAVE A REPLY

*