आपला माणूसच्या रिमेकमध्ये आता करिनाऐवजी सोनाक्षी ?

0

मुंबई- एका बाजूला तैमूरची जबाबदारी तर दुसरीकडे आपलं पॅशन जपण्यासाठी करिनाने एक तडजोड केली आहे. एका वर्षी एकच सिनेमा करणार असल्याच करिनाने सांगितलं आहे. त्यामुळे कोणताही मोठ्या बॅनरचा नवा सिनेमा येत असला तरीही करिना तो सिनेमा नाकारत असल्याची माहिती मिळाली आहे. करिनाला मराठी सिनेमा आपला माणूसच्या हिंदा रिमेकची ऑफर आली होती. या सिनेाची निर्मिती आशुतोष गोवारिकर करणार असून याबाबत आशुतोष यांनी करिनाशी चर्चा केली आहे.

मात्र करिनाने या सिनेमांत काम करण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे करिना आपला माणूसच्या रिमेकचा भाग नसणार आहे. ती लवकरच राज मेहता दिग्दर्शित चित्रपटात झळकणार आहे. ज्यात ती अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे करिनाने नकार दिल्या नंतर आशुतोष या चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हाशी चर्चा करतो आहे. सोनाक्षीला या सिनेमाची स्क्रिप्ट खूप आवडली आहे त्यामुळे आता आपला माणूसच्या रिमेकमध्ये आपल्याला सोनाक्षी सिन्हा दिसण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

*