Type to search

देश विदेश मुख्य बातम्या

पेट्रोल-डिझेल सलग नवव्या दिवशी महागलं

Share
नवी दिल्‍ली : पेट्रोल, डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. देशभरात पेट्रोल, डिझेलच्या दरात विक्रमी वाढ पाहायला मिळत आहे. शुक्रवारी (दि. १८) पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालेली दिसून आली. पेट्रोल ७ पैशांनी तर डिझेल दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये 19 पैशांनी तर मुंबईमध्ये 20 पैशांनी वाढलं आहे.

दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर  70.55 रुपये, 72.65 रुपये, 76.18 रुपये आणि 73.23 रुपये प्रति लीटर झाले आहेत. या चारही मोठ्या शहरांमध्ये डिझेल 64.97 रुपये, 66.74 रुपये, 68.02 रुपये आणि 68.62 रुपये प्रति लीटर झालं आहे.

आतंरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम पेट्रोल- डिझेलच्या किमतीवर झाला आहे. इंधन दरवाढीमुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत असून याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!