सिंगापूरच्या मॅडम तुसादमध्ये अनुष्काचा खास पुतळा

0

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा आता सिंगापूरच्या ‘मादाम तुसाँ’ म्युझियममध्ये दाखल होणार आहे. ऑप्रा विन्फ्रे, क्रिस्टिआनो रोनाल्‍डो, लुइस हैमिल्‍टन अशा इंटरनॅशनल सेलिब्रिटींसोबत अनुष्काचा पुतळा उभा राहणार आहे.

अनुष्का शर्माचा सिंगापूरच्या मॅडम तुसाद म्युझियममध्ये लागणारा पुतळा खास आहे. हा पुतळा इतर भारतीय सेलिब्रिटींच्या तुलनेत थोडा हटके आहे. कारण हा पुतळा हालचाल करणार आहे. बोलनार्‍या अनुष्काच्या स्वरूपात हा पुतळा साकारला जाणार आहे. अनुष्काच्या हातामध्ये फोन असेल तर हा पुतळा येणार्‍या लोकांना अभिवादनही करणार आहे. अशाप्रकारचा पुतळा असलेला अनुष्का ही पहिली भारतीय सेलिब्रिटी आहे.

LEAVE A REPLY

*