अनुनादमध्ये कीर्ती पंढपूरकर यांची मैफिल

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– अनुनाद फाऊंडेशनच्या अनुनाद म्युझिक अँड डान्स अकॅडमीतर्फे येत्या रविवारी (दि. 8) सायंकाळी 6 वाजता प्रमोद कांबळे आर्ट गॅलरी येथे मासिक संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यातील उदयोन्मुख गायिका कीर्ती पंढरपूरकर यांची शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग, नाट्यगीत, गायनाची मैफिल होणार आहे. कीर्ती पंढरपूरकर यांनी विविध महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. गायनाच्या अनेक स्पर्धांमध्ये परितोषके मिळविलेली आहेत. त्यांना तबल्याचे शिक्षक कल्पेश अदवंत हे साथ करणार आहेत. नीलय साळवी हार्मोनियमची साथ देतील. भरतनाट्यम शिक्षिका प्रचिती देवचके या त्यांच्या शिष्यांसमवेत रतनाट्यम नृत्य प्रस्तुत करणार आहेत.
अनुनाद फाऊंडेशन या नगरमधील सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेतर्फे नगरमध्ये अनेक दिग्गज व नामवंत अशा कलावंतांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनुनाद फाऊंडेशनने अनुनाद म्युझिक अँड डान्स अकॅडमीची स्थापना केली आहे.
तबला, भरतनाट्यम, सिंथेसायझर, गिटार यांचे शास्रोक्त प्रशिक्षण तज्ज्ञ गुरूंद्वारे विद्यार्थ्यांना दिले जाते. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून या कार्यक्रमाचा जरूर आस्वाद घ्यावा, असे आवाहन अकादमीतर्फे तन्मय देवचके, कल्पेश अदवंत यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*