Type to search

#MeToo: ‘अन्नू मलिक यांच्यावरील सर्व आरोप खरे’ – गायिका’अलिशा चिनॉय

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

#MeToo: ‘अन्नू मलिक यांच्यावरील सर्व आरोप खरे’ – गायिका’अलिशा चिनॉय

Share

मुंबई: लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर संबंधित वाहिनीनं तातडीनं कारवाई करत संगीतकार आणि गायक अन्नू मलिक यांना ‘इंडियन आयडॉल १०’च्या परीक्षक पदावरून त्यांची हकालपट्टी केली आहे. मलिक यांच्यावरील सर्व आरोप खोटं असल्याचं त्यांचाकडून सांगण्यात येत असलं तरी प्रसिद्ध गायिका’अलिशा चिनॉय’ यांनी अन्नू मलिक यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खरे असल्याचं म्हटलं आहे.

अलिशा यांनी मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या प्रकरणात कोर्टानं अलिशा यांच्या बाजूनं निकाल दिला होता. असं असलं तरी मलिक यांच्या प्रकरणामुळं अलिशा यांना मानसिक त्रासातून जावं लागलं होतं. ‘मलिक यांच्यावर वारंवार आरोप झाले मात्र, बॉलिवूडमधील मोठे निर्माते त्यांच्या बाजूनं होते. त्यामुळं मलिक यांच्या वागणुकीत काहीच बदल झाला नाही’ असंही अलिशा म्हणाल्या.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!